शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ॲम्युनेशन फॅक्टरीच्या कर्मचाऱ्याचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खडकी येथील ॲम्युनेशन फॅक्टरीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे गेटवरुन अपहरण करण्याचा प्रकार समोर आला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : खडकी येथील ॲम्युनेशन फॅक्टरीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे गेटवरुन अपहरण करण्याचा प्रकार समोर आला आहे. उपचारासाठी उधार घेतलेली रक्कम परत केल्यानंतरही आणखी पैशाचा तगादा लावत अपहरण करण्यात आले. संबंधिताकडे ५ लाखाची मागणी करत हातपाय बांधून मारहाण देखील करण्यात आली आहे. मारहाण केल्यानंतर कोऱ्या धनादेशावर स्वाक्षरी घेऊन ५ लाखाची रक्कम वटवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात संदीप अहिर, रबिल व त्यांच्या दोन साथीदारांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रेंजहिल्स येथे रहाणाऱ्या एका ४३ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे.

महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी संदीप अहिर यांच्याकडून औषधोपचाराकरीत ६० हजार रुपये उधार घेतले होते. हे पैसे त्यांनी व्याजासहित परत केले होते. मात्र तरीही आरोपी त्यांच्या पतीला जीवे ठार मारण्याची धमकी देत आणखी पैशाची मागणी करत होते. त्यांच्या पतीने आरोपीला स्वत:चे एटीएम कार्ड दिले होते. ते पतीने बंद केल्याचा रागही अहिरला होता. यामुळे तो वारंवार त्यांच्या पतीला फोन करुन पैशासाठी धमक्या देत होता. त्यांनी पैसे न दिल्याने अहिरने त्याच्या साथीदारांच्या फिर्यादी यांच्या पतीचे खडकी ॲम्युनेशन फॅक्टरीच्या गेटवरुन १७ फेब्रुवारी रोजी अपहरण केले. यानंतर त्यांच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी करुन हातपाय बांधून मारहाण केली. तसेच त्यांच्याकडून घेतलेल्या कोर्‍या धनादेशावर जबरदस्तीने स्वाक्षरी घेण्यात आली. यानंतर धनादेश वटवण्यास देऊन तो बाऊन्स करुन घेतला. सहायक पोलीस निरीक्षक कोळी अधिक तपास करीत आहेत.

सहायक पोलीस निरीक्षक कोळी यांनी सांगितले की, अपहरण झालेल्या व्यक्तीची पत्नी आजारी असल्याने उपचारासाठी त्यांनी पैसे घेतले होते. अपहरण करण्यात आलेली व्यक्ती येथील ॲम्यूनेशन फॅक्टरीत कर्मचारी आहे.