शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीचे अपहरण करणाऱ्यास अटक

By admin | Updated: June 3, 2015 04:23 IST

: भोर तालुक्यातील नसरापूर येथील स्वप्नलोक टाऊनशिपमधून चॉकलेट देतो, या बहाण्याने ३ वर्षांच्या बालिकेचे अपहरण करणाऱ्या दीपक राजकुमार

नसरापूर : भोर तालुक्यातील नसरापूर येथील स्वप्नलोक टाऊनशिपमधून चॉकलेट देतो, या बहाण्याने ३ वर्षांच्या बालिकेचे अपहरण करणाऱ्या दीपक राजकुमार सोनी या नराधमास राजगड पोलिसांनी मुंबई येथील घाटकोपर येथे सापळा रचून पकडले आहे.नसरापूर येथील स्वप्नलोक टाऊनशिपमधून दि.२८ रोजी बांधकामावर काम करणाऱ्या दीपक राजकुमार सोनी या बांधकाम मजुराने ओळखीच्या बहाण्याने सिंधू सुरेश चव्हाण हिला चॉकलेट देतो, असे सांगून मजुरांच्यावसाहतीतीतून अपहरण केले होते. राजगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक शाहुराजे साळवे यांनी सांगितले, की चिमुकल्या सिंधूचे अपहरण झाल्याने तिचे कुटुंबीय चिंतातूर झाले होते. राजगड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला खबऱ्यांकडूनमिळालेल्या माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे हे आपल्या तपास पथकासह मुंबईकडे रवाना झाले होते. तरीही दीपक सोनी हा साध्या वेशातील पोलिसांना चकवत होता, मात्र या पथकाने वेळेचे भान राखून उत्तर प्रदेशकडे निघालेल्या आरोपीला सिंधूसह घाटकोपर येथे ताब्यात घेतले.सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांचेसह पोलीस नाईक विकास कांबळे, अजय शिंदे, दिनेश कोळेकर, संजय शेंडगे, जय पवार यांनी ही कामगिरी केली़ दीपक सोनी याला भोर येथे न्यायालयात हजर केले असता, त्याची १५ दिवसांकरिता पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. (वार्ताहर)