शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आचाऱ्याचे अपहरण करून मालकाला मागितली खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:14 IST

पुणे : हॉटेलमध्ये जेवण बनवून झाल्यावर दुचाकीवरून घरी निघालेल्या आचाऱ्याचे अपहरण करून त्याच्या हॉटेल मालकाकडे १० ...

पुणे : हॉटेलमध्ये जेवण बनवून झाल्यावर दुचाकीवरून घरी निघालेल्या आचाऱ्याचे अपहरण करून त्याच्या हॉटेल मालकाकडे १० हजार रुपयांची खंडणी मागण्यात आली. ही घटना खराडी बायपास परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेऊन तिघांना अटक केली.

मुकेश मनोज जाधव (२१ ,रा. नागपाल रोड), मनोहर काशिराम जाधव (२३ ,रा. शिरूर), विनोद चव्हाण (चंदननगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विश्वजीत पाल असे अपहरण झालेल्या आचारीचे नाव आहे. याप्रकरणी गगन अशोक तलवार (२१, रा. खराडी) यांनी चंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तलवार यांच्याकडे आचारी विश्वजीत पाल काम करतो. तो जेवण बनवून झाल्यावर घरी दुचाकीवर चालला होता. या वेळी आरोपींनी त्याला खराडी बायपासजवळ मारहाण करून टमटम रिक्षामध्ये टाकले. पाल याला वाटले धक्का लागल्यामुळे मारहाण केली असेल. मात्र रिक्षाचे पडदे लावून त्याला चंदननगर येथील जंगल परिसरात नेले. तेथे पुन्हा मारहाण करून पैशाची मागणी करण्यात आली. त्याने पैसे नसल्याचे सांगितल्यावर मालकाकडून पैशाची मागणी करण्यास सांगितले. त्याने मालकाकडे फोन करून पैसे मागितले, मात्र पैसे पाठविण्यासाठी ते स्वत:चा गुगल पे नंबर देत नव्हते.

त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा मालकाला फोन करून आम्ही तुझ्या जिवाचे बरे-वाईट करणार आहोत असे सांगायला लावले. मालकाला सुरुवातीला हा प्रकार खोटा वाटल्यामुळे त्यांनी रस्त्याने जाऊन पाहिले. त्यावेळी पाल याची दुचाकी पडल्याचे दिसले. तेथील नागरिकांपाशी चौकशी केली असता, त्यांनी तिघांनी एका व्यक्तीला रिक्षात घालून नेल्याचे सांगितले. त्यानंतर मालकाने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे मालकाने फोनवर आरोपींसोबत संवाद सुरू ठेवला. यानंतर पोलिसांनी जंगल परिसराकडे धाव घेतली असता, तेथे आरोपींनी आचाऱ्याला मारहाण करून डांबून ठेवल्याचे दिसले. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तिघांपैकी दोघे मूळचे कर्नाटक येथील आहेत. तर अन्य एक बिडी कामगार वसाहत येथील रहिवासी आहे. ही कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक गजानन जाधव, कर्मचारी महेश नानेकर, अमित कांबळे यांच्या पथकाने केली.