शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

खेड विमानतळासाठी कोये, कडूसला पाहणी

By admin | Updated: September 3, 2016 03:13 IST

खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील कोये, कडूस, धामणे परिसरामधील जागेची विमानतळ प्राधिकरणाच्या पथकाने शुक्रवारी पोलीस बंदोबस्तामध्ये पाहणी केली.

पाईट : खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील कोये, कडूस, धामणे परिसरामधील जागेची विमानतळ प्राधिकरणाच्या पथकाने शुक्रवारी पोलीस बंदोबस्तामध्ये पाहणी केली.खेड तालुक्यामध्ये नियोजित विमानतळ होणार असल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर, खेड तालुक्यामधील कोणत्या जागेत नियोजित विमानतळ होणार, हे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या पथकाने पाहणी केल्यावर स्पष्ट होईल, असे सांगितले होते; तसेच विमानतळ प्राधिकरणाचे पाहणी पथक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही पाहणी करणार, असे जाहीर केले होते.नियोजित ठरल्याप्रमाणे शुक्रवारी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या समवेत आलेल्या विमानतळ प्राधिकरणाच्या ७ ते ८ अधिकाऱ्यांच्या पथकाने कडूस, कोये व धामणे परिसराची पाहणी केली. या वेळी पथकासमवेत विश्वास पाटील, प्रांताधिकारी हिंमत खराडे, मावळचे प्रांताधिकारी सुनील थोरवे, उपविभागीय पोलीस अधिकारी मितेश गट्टे, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी व मोठ्याा प्रमाणावर पोलीस या वेळी उपस्थित होते.या सुरुवातीस हे पथक कडूसमार्गे येऊन कोये गावच्या हद्दीमधील भिसांबा ठाकरवाडीजवळील टेकडीवरून कडूस, पाईट, कोये, गारगोटवाडी परिसराची सुमारे तासभर पाहणी केली. यानंतर पथक पाईटमार्गे धामणे परिसरातील धामणे गावच्या रस्त्यावर वाहने उभी करून पाहणी केली. या वेळी मोठ्या प्रमाणावर परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. विमानतळ ‘सेझ’मध्ये होणार असल्याचे जाहीर केले; पण पाहणीमात्र पाईट, कोये, धामणे परिसराची करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, विमानतळ नक्की कोठे होणार, याबाबत संभ्रम कायम आहे. (वार्ताहर)जागेचा पुन्हा संभ्रमच!खेड तालुक्याच्या पूर्व भागातील सेझ परिसरात विमानतळ जागेची पाहणी करण्यासाठी येणारे पथक शुक्रवारी या परिसरात फिरकलेच नाही. सेझ बाधित शेतकरी दिवसभर पथकांची वाट पाहत ताटकळत होते. कडूस-कोये येथील जागेची पाहणी केली. त्यामुळे विमानतळासाठी नेमकी कोणती जागा निश्चित होणार, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.