शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

ख्याल, ठुमरीने आळंदीत रंगणार मैफल !

By admin | Updated: February 5, 2015 00:20 IST

आळंदीकरांना उद्या (दि. ५) ख्याल, ठुमरी असे शास्त्रीय गायनातील प्रकार ऐकण्याची संधी मिळणार आहे.

पुणे : आळंदीकरांना उद्या (दि. ५) ख्याल, ठुमरी असे शास्त्रीय गायनातील प्रकार ऐकण्याची संधी मिळणार आहे. गायनातील आक्रमक तालबाजी, स्वरांवर प्रभुत्व व लयकारी, असे गायनातील विविध पैलू समजून घेता येणार आहेत. निमित्त आहे पतियाला घराण्याचे गायक जगविख्यात सूरमणी पं. प्रकाशसिंहजी साळुंके यांच्या शास्त्रीय संगीत मैफिलीचे. ह.भ.प. सर्जेराव गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त ही मैफील आयोजित केली आहे. पं. प्रकाशसिंहजी साळुंके यांची पतियाला घराण्याची १३वी पिढी आहे. त्यांच्या ६ पिढ्या हैदराबाद दरबारात गायन करीत होत्या. त्यांना पुण्यात स्थायिक होऊन २८ वर्षे झाली असून, संगीतात त्यांना डबल एम.ए. केले आहे. ख्याल गायकीसह ठुमरी, टप्पा गायकी आणि तराण्यावर त्यांचे उत्तम प्रभुत्व असून, जागतिक स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या विविध सांगीतिक महोत्सवात त्यांनी आपल्या गायकीचा ठसा उमटविला आहे. पं. प्रकाशसिंहजी यांना देशविदेशांतील रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सवा’त १९७२, १९७४ आणि १९८४ अशी तीन वर्षे आपली कला सादर करण्याची संधी मिळाली होती. (वार्ताहर)चांगलं गाणं हे शहरात असो व खेड्यात, ते रुचतं. आळंदीला तसाही संगीताचा मोठा वारसा आहे. भजनातही रागदारी असतेच. तेथे शिकण्यासाठी बाहेरूनही अनेक जण आले आहेत. त्यांना आणखी ‘गाणं’ शिकता येईल.- पं. प्रकाशसिंहजी साळुंके, जगविख्यात सूरमणी