शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठातील क्रीडा संकुलाला खाशाबा जाधव यांचे नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:15 IST

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुलाला ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक खेळात पहिले पदक मिळविणारे पहिलवान ...

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुलाला ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक खेळात पहिले पदक मिळविणारे पहिलवान खाशाबा जाधव यांचे नाव देण्याचा निर्णय बुधवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. दिवाळीनंतर विद्यापीठाच्या या क्रीडा संकुलाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि विविध आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या क्रीडा प्रकारांचा सराव करता यावा, या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठ आवारातील तब्बल २७ एकर जागेत सर्व प्रकारचे इनडोअर व आउटडोअर क्रीडा प्रकारांसाठी सुविधा निर्माण केली. बालेवाडी येथील क्रीडा संकुलानंतर विद्यापीठातील क्रीडा संकुल हे सर्वांत मोठे क्रीडा संकुल असणार आहे. त्यात रनिंग ट्रॅक, ॲथलेटिक, टेनिस, खो-खो, कबड्डी, शूटिंग रेंज, बॅडमिंटन आदी सुमारे १०० खेळांचे प्रशिक्षण घेता येणार आहे.

विद्यापीठाने या क्रीडा संकुलासाठी सुमारे ५० कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यातील काही रक्कम विद्यापीठ अनुदान आयोगाकडून प्राप्त झाली असून, काही राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाकडून (रुसा) मिळाली आहे. उर्वरित रक्कम विद्यापीठाने स्वत: खर्च केली आहे. क्रीडा संकुलाच्या आवारात सुमारे २ हजार क्षमतेचे प्रशस्त सभागृह उभारण्यात आले आहे. सुमारे पाच ते सहा वर्षांपासून सुरू असलेल्या या क्रीडा संकुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हॉकी व जलतरण तलावाचे काम पुढील एक ते दीड महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यानंतर क्रीडा संकुलाचे उद्घाटन केले जाणार आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी बुधवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत क्रीडा संकुलाला खाशाबा जाधव यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला. त्यास व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सर्वांनी प्रस्ताव एकमताने मंजूर केला.

खेळाडूंना प्रोत्साहन

राजेश पांडे म्हणाले, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या क्रीडा संकुलाचा निश्चितच फायदा होईल. क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे असल्यामुळे खेळाडूंना ऑलिम्पिकसह इतर क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सराव करणे सोपे जाईल. विद्यापीठाचे माजी विद्यार्थी खाशाबा जाधव यांचे नाव क्रीडा संकुलाला दिल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल.

---------------

फोटो - खाशाबा जाधव आणि

पुणे युनिव्हर्सिटी