शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खरपुडी बंधारा फोडला

By admin | Updated: May 6, 2016 05:44 IST

खरपुडी (ता. खेड) येथील बंधाऱ्याचे ढापे पाण्यासाठी शेतकऱ्यांनी रात्री फोडल्यामुळे लाखो लिटर पाणी या बंधाऱ्यातून वाहून गेले आहे. बंधारा रिकामा झाला असून या परिसरात पिके

दावडी : खरपुडी (ता. खेड) येथील बंधाऱ्याचे ढापे पाण्यासाठी शेतकऱ्यांनी रात्री फोडल्यामुळे लाखो लिटर पाणी या बंधाऱ्यातून वाहून गेले आहे. बंधारा रिकामा झाला असून या परिसरात पिके जळण्याच्या मार्गावर आहे. खरपुडी येथील भीमा नदीवरील बंधारा या परिसराला वरदान ठरला आहे. या बंधाऱ्यात १.४२ दशलक्ष घनमीटर पाणी साचते. खरपुडी खुर्द, खरपुडी बुद्रुक, मांजरेवाडी (पिंपळ), मांजरेवाडी (धर्म), मलघेवाडी येथील शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा होतो. या बंधाऱ्यातील पाणी जून महिन्यापर्यंत टिकते. दोन आठवड्यांपूर्वी भीमा नदीलगत असणाऱ्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी या बंधाऱ्याचे ढापे काढले होते. याबाबत ‘लोकमत’ने सचित्र वृत्त छापले होते. याची दखल घेऊन प्रशासनाने तातडीने या बंधाऱ्याचे काढलेले ढापे बसविण्यात आले होते. बुधवारी रात्री नदीकाठच्या व बंधाऱ्याखालील शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आक्रमक होऊन पुन्हा एकदा या बंधाऱ्याचे दोन मोऱ्यांचे ढापे फोडले. या बंधाऱ्याचे चौकीदार अनंता होले यांनी बंधाऱ्याचे ढापे काढू नका, असे सांगितले. तसेच, बंधाऱ्याचे ढापे फोडण्यास होले यांनी मज्जाव केला असता आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी होले यांना दम देऊन पिटाळून लावले. दोन मोऱ्यांचे ढापे फोडल्यामुळे बंधाऱ्यातून लाखो लिटर पाणी वाहून गेले आहे. बंधारा रिकामा झाला असून येथील शेतकरी हैराण झाला आहे. बंधाऱ्यात पाणीच नसल्यामुळे पिके जळून जाणार आहे. (वार्ताहर)