शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

खरीप वाया जाऊनही नाही दुष्काळ !

By admin | Updated: December 29, 2014 00:36 IST

संपूर्ण खरीप हंगाम वाया जाऊनसुद्धा खेड तालुक्यात दुष्काळ नसल्याचा साक्षात्कार प्रशासनाला झाला असून, पीकपाहणीनंतर एकाही गावाची आणेवारी ५० पैशाच्या खाली नसल्याचे शासनाला आढळले आहे.

राजगुरुनगर : संपूर्ण खरीप हंगाम वाया जाऊनसुद्धा खेड तालुक्यात दुष्काळ नसल्याचा साक्षात्कार प्रशासनाला झाला असून, पीकपाहणीनंतर एकाही गावाची आणेवारी ५० पैशाच्या खाली नसल्याचे शासनाला आढळले आहे.यावर्षी तालुक्यात खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. मुळात पाऊस सुरूव्हायला जुलै महिन्याचा मध्य उजाडला होता. पावसाची मृग आणि आर्द्रा ही दोन्ही नक्षत्रे कोरडी गेली होती. त्यामुळे बाजरी, भुईमूग या पिकांच्या पेरण्या खूप कमी प्रमाणात शेतकऱ्यांनी केल्या.कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार तालुक्यात खरिपाचे ४८५५७ हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. त्यापैकी अवघ्या २७१५८ हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण होटकर यांनी दिली. बाजरीचे सरासरी क्षेत्र ४२१० हेक्टर एवढे मुळातच घटले आहे. त्यापैकी केवळ ८१७ हेक्टरवर म्हणजे १९ टक्केच पेरणी यावर्षी झाली. भुईमूग पिकाचे क्षेत्र ११०८१ हेक्टर आहे. त्यापैकी केवळ ४७०५ हेक्टरवर म्हणजे ४२ टक्के पेरणी झाली. तूर, मूग, उडीद, मटकी, चवळी, घेवडा, वाल, पावटा, हुलगा या खरीप कडधान्यांच्याही पेरण्या फक्त ५३ टक्के झाल्या. बटाटा अवघा ५५ टक्के लावला गेला. बाजरी, भुईमूग, बटाटा, कडधान्ये ही खरिपाची प्रमुख पिकांची पेरच मुळात निम्मी झाली. त्यानंतर पावसाची अनियमितता, उशिरा पेर आणि हंगाम चक्र बिघडल्याने उत्पादन घटूनही शासनाला आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी दिसली नाही, हे नवलच झाले.