शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

खरीप पीक पॅटर्न बदलतोय

By admin | Updated: August 31, 2016 01:23 IST

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांत झपाट्याने होत असलेल्या नागरीकरणाचा परिणाम जिल्ह्यातील कृषिक्षेत्रावर होत असून, खरिपाचा पीक पॅटर्न बदलत आहे.

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांत झपाट्याने होत असलेल्या नागरीकरणाचा परिणाम जिल्ह्यातील कृषिक्षेत्रावर होत असून, खरिपाचा पीक पॅटर्न बदलत आहे. भाजीपाला, कडधान्ये व फळलागवडीकडे शेतकरी वळत आहेत. जिल्ह्यात खरिपात ६ हजार ६६३.४७ हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड झाली असून, सोयाबीन ३९५, मूग २१६ तर मका यांची १६४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. खरिपातील महत्त्वाचे असलेले भातपिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत असून, या वर्षी ७२ टक्केच लागवड झाली आहे. गेली काही वर्षे पडत असलेल्या अनियमित पावसामुळेही हा बदल होत आहे. या वर्षी जिल्ह्याच्या पश्चिम भागात चांगला पाऊस असल्याने या परिसरात घेत असलेल्या खरीप हंगामाची स्थिती चांगली आहे. ऊस वगळता १३२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जून महिना कोरडा गेल्याने खरीप हंगाम वाया जातो की काय, अशी भीती निर्माण झालेल्या बळीराजाला पावसाने चांगली साथ दिली आहे. आजअखेर एकूण १०,५८२.२ मि.मी. एवढा पाऊस झाला असून, तो सरासरी ८१४.० मि.मी. आहे. हा पाऊस पश्चिम भागात चांगला झाला असून, खरीप पिके याच क्षेत्रात घेतली जातात. यात भातपीक हे सर्वांत मोठ्या प्रमाणात म्हणजे ६२ हजार हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते. मात्र, काही दिवसांपासून भाताचे क्षेत्र कमी होत आहे. या वर्षी ७ हजार २९०.५३ हेक्टरवर भातपीक घेण्याचे कृषी विभागाचे नियोजन होते. मात्र, आतापर्यंत फक्त ७२ टक्के म्हणजे ५ हजार २१०.८९ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. यापुढे लागवड होणार नसल्याने हे क्षेत्र याही वर्षी घटले आहे. मुळशी, मावळ, हवेली, भोर व वेल्हे या तालुक्यांत जमीनविक्री वाढली आहे. त्यामुळे जमिनीला कंपाऊंड पडले असून, तेथे पीक घेणे बंद झाले आहे. त्यामुळे भातपीक कमी होत असल्याचे जिल्ह्याचे कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पुणे, पिंपरी-चिंचवड ही शहरे झपाट्याने वाढत आहेत. पीएमआरडीए क्षेत्रातही नागरी क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या वर्गाची भाजीपाला, फळे, कडधान्यांची जास्त मागणी आहे. हे लक्षात घेता, पारंपरिक पीक न घेता मागणीप्रमाणे पीक घेण्याकडे शेतकरी वळत आहे.बाजरीचे मोठे क्षेत्र होते. त्याची जागा आता बटाटापीक घेत आहे. तसेच, येथे सोयाबीन पीक घेण्याकडेही शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. या वर्षी तर ३९५ टक्के क्षेत्रावर सोयाबीन पेरणी झाली आहे.१० ते १५ वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी ज्वारीपीक मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. तेथील शेतकरी आता मकापिकाकडे वळत आहेत.