शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

‘खाकी’मुळे जुळले जीवनगाणे

By admin | Updated: July 12, 2016 01:36 IST

‘सैराट झालं जी...’ म्हणून तरुणाई मुक्त झाली असली तरी ‘खानदान की इज्जत’साठी प्रेमीजनांची ताटातूट करण्याचे प्रकार होतच आहेत. मात्र, पुणे पोलिसांनी सकारात्मकपणे

पुणे : ‘सैराट झालं जी...’ म्हणून तरुणाई मुक्त झाली असली तरी ‘खानदान की इज्जत’साठी प्रेमीजनांची ताटातूट करण्याचे प्रकार होतच आहेत. मात्र, पुणे पोलिसांनी सकारात्मकपणे प्रयत्न करून एका दांपत्याच्या रेशीमगाठी पुन्हा जुळविल्या. खऱ्या प्रेमाला एकत्र आणण्यासाठी बड्या राजकीय पदाधिकाऱ्यांचा दबावही मानला नाही. मराठवाड्यातील एका राजकीय कुटुंबातील तरुणीची पुण्यात शिक्षणासाठी आली असता एकाशी मैत्री झाली. यातूनच प्रेम बहले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आळंदीला जाऊन त्यांनी लग्नही केले. तरुणाच्या कुटुंबियांची या लग्नाला संमती होती. मुलीने मात्र माहेरच्यांकडून ही बाब लपवली होती. परंतु, तिच्या सासऱ्यांनी माहेरच्यांना लग्नाबाबत सांगावे असा आग्रह धरला. मुंबईमध्ये असलेल्या नातेवाईक डॉक्टर दाम्पत्याला लग्नाबाबत सांगताच ते पुण्यात आले. त्यांनी तरुणीचे लग्न झाल्याची खात्री करुन तिच्या चुलत्यांना याची माहिती कळवली. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांना हे मान्य नव्हते. वडील लहानपणीच गेल्याने राजकीय पदाधिकारी असलेल्या चुलत्याने तिचे संगोपन केले होते. इमोशनल ब्लॅकमेल करीत आईने चुलत्याला हृदयविकाराचा अ‍ॅटॅक आल्याची बतावणी करून मुलीला घरी नेते म्हणून सांगितले. पतीला संशय असल्याने त्याने परत सोडण्याबाबत लेखी घेतले होते. त्याप्रमाणे आई मुलीला घेऊन गेली. मात्र, त्यानंतर एमबीए झालेल्या या उच्चशिक्षित तरुणीला तब्बल अडीच महिने डांबून ठेवले. ही तरुणी आजी आणि मोलकरणीच्या मोबाईलवरून पतीला मेसेज पाठवीत होती. वकील असलेल्या पतीने याबाबत परिमंडल दोनचे उपायुक्त पंकज डहाणे यांच्याकडे अर्ज दाखल केला. त्यानुसार, मुलीसह तिचे चुलते आणि आईला पुण्यात बोलावून घेण्यात आले. प्रवासात असतानाच चुलते आणि आईने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याने या मुलीने माहेरी रहायचे असल्याचा जबाब दिला. त्यामुळे तिला त्यांच्यासोबत परत पाठवावे लागले. (प्रतिनिधी)