शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

खराडी अपघातातील चालकाकडे वाहन परवाना नसल्याचे उघड, पोलीस कोठडीचे हक्क अबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 01:13 IST

वाहन चालविण्याचा परवाना नसतानादेखील खराडी येथील अपघातातील आरोपी चारचाकी वाहन चालवत असल्याची बाब समोर आली आहे.

पुणे : वाहन चालविण्याचा परवाना नसतानादेखील खराडी येथील अपघातातील आरोपी चारचाकी वाहन चालवत असल्याची बाब समोर आली आहे. बेदरकारपणे मोटार चालवून आजी-नातवाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणात चंदननगर पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाची रवानगी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली.ओळख परेडसाठी पोलीस कोठडी घेण्याचे हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यासाठी पोलिसांनी केलेला अर्ज ग्राह्यधरत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांनी हा आदेश दिला आहे. सौरभ शशिकांत जासूद (वय २०, रा. चंदननगर) असे त्याचे नाव आहे. खराडी येथील टस्कन सोसायटीसमोर बुधवारी (दि. १९)रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली होती.याबाबत दिलीप रामभाऊ लोखंडे (वय ४२, रा. खराडी) यांनी फिर्याद दिली आहे. जासूद याने मोटार वेगाने चालवून आजी शांताबाई साहेबराव सोनवणे (वय ६१) आणि नातू नयन रमेश मोकळे (वय ११) यांना धडक दिली. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला तर फिर्यादी जखमी झाले आहेत. चार वाहनांनाही धडक देण्यात आली होती. अपघातानंतर जासूद फरार झाला होता. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. अशोक संकपाळ यांनीकाम पाहिले.>प्रकरण दाबण्याचा प्रयत्नजासूद यांचे वडील पुणे महानगरपालिकेत अधिकारी आहेत. त्याचे चुलते शिरूर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य असल्याने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप मृत्यू झालेल्यांच्या नातेवाइकांनी केला होता. पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक करावी, यासाठी परिसरातील नागरिकांना गुरुवारी रास्ता रोको देखील केले होते. वाहनावरील वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे दिसून येते. आरोपीने मद्यपान केले होते की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती या प्रकरणातील तपासी अधिकारी चंदननगर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक यांनी दिली.