शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खडकवासला प्रकल्पात एका दिवसात चार टीएमसी पाणी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:08 IST

पुणे : खडकवासला धरण प्रकल्पात एका दिवसात चार टीएमसी पाणी वाढले आहे. बुधवारी (दि. २१) रोजी १२.२३ टीएमसी साठा ...

पुणे : खडकवासला धरण प्रकल्पात एका दिवसात चार टीएमसी पाणी वाढले आहे. बुधवारी (दि. २१) रोजी १२.२३ टीएमसी साठा होता. तो गेल्या २४ तासांत चार टीएमसीने वाढून १६.३८ टीएमसी साठा झाला असून, प्रकल्पात एकूण ५६.१८ टक्के साठा झाला आहे. तर खडकवासला धरण भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे खडकवासलातून गुरुवारी दुपारी २४०० क्यूसेकने तर, सायंकाळी सहा वाजता ५ हजार क्यूसेकने तर, रात्री आठ वाजता १० हजार ९६ क्यूसेकने पाणी सांडव्यात सोडण्यास सुरुवात झाली आहे.

पुणे जिल्ह्यातील मुळशी धरण क्षेत्रात ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. ताम्हिणी परिसरात गेल्या २४ तासांत तब्बल ४६८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणात पातळीत ७ फुटांने (३८.६० टक्के साठा) वाढ झाली आहे. खडकवासला प्रकल्पातील टेमघर धरण क्षेत्रात गुरुवारी सर्वात जास्त १९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल वरसगाव धरण क्षेत्रात १०१ मिलिमीटर तर पानसेत धरण क्षेत्रात ९६ मिलिमीटर पाऊस झाला असून, खडकवासला परिसरात १५ मिलिमीटर पावसाची नाेंद झाली आहे.

चौकट

दोन धरणे शंभर टक्के तर, बारा धरणांत ५० टक्क्यांच्या पुढे साठा

जिल्ह्यातील कळमोडी आणि कासारसाई ही दोन धरणे शंभर टक्के भरली आहेत. तर खडकवासला धरण (९६.१७ टक्के) भरण्याच्या मार्गावर आहे. तसेच आंध्रा धरण ८६.३० टक्के, वडिवळे ७८.१५ टक्के, पानशेत ६०.६३ टक्के, भामा आसखेड ५५.८२ टक्के, वडज ५२.८२ टक्के, वरसगाव ५१.९४ टक्के, वीर ४९.८४ टक्के, नीरा देवघर ४८.३६ टक्के, येडगाव ४७.६७ टक्के, डिंभे ४३.७३ टक्के भरले आहे.

चौकट

जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्याची माहिती

धरण - प्रकल्प साठा - सध्याचे टीएमसी

खडकवासला - १.९७ - १.७५

वरसगाव - १२.८२ - ५.८९

पानशेत - १०.६५ - ५.७९

टेमघर - ३.७१ - १.११

पवना - ८.५१ - ४.६९

कळमोडी - १.५१ - १.५१

चासकमान - ७.५८ - ३.२०

आंध्रा - २.९२ - २.५२

मुळशी - १८.४७ - ७.७८

नीरा देवघर - ११.७३ - ५.६७

वडिवळे - १.०७ - ०.८४

भाटघर - २३.५० - ८.२९

वडज - १.१७ - ०.६२

वीर - ९.४१ - ४.६९

उजनी - ५३.५७ - १.००

डिंभे - १२.४९ - ५.४६

भामा आसखेड - ७.६७ - ४.२८

कासारसाई - ०.५७ - ०.५५

येडगाव - २.८० - ०.९३

घोड - ५.४७ - ०.४४

विसापूर - ०.९० - ०.०८

पिंपळगाव जोगे - ३.८९ - ०००

माणिकडोह - १०.१७ - २.०८

गुंजवणी - ३.६९ - १.८९

फोटो - खडकवासला