शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

कळमोडी पाणी योजना मार्गी लागणार

By admin | Updated: April 27, 2017 04:45 IST

कळमोडी मध्यम धरण प्रकल्पाचे पाणी खेड, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांसह थिटेवाडीपर्यंत

शिक्रापूर : कळमोडी मध्यम धरण प्रकल्पाचे पाणी खेड, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांसह थिटेवाडीपर्यंत पोहोचविण्याच्या महत्त्वाकांक्षी सिंचन योजनेचा सुधारित प्रस्ताव पुढील दोन महिन्यांत सादर करण्याचे आदेश जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी झालेल्या विशेष बैठकीत दिले. शिरूर, खेड व आंबेगाव तालुक्यांसाठी सन २०१४ मध्ये कळमोडी मध्यम धरण प्रकल्पातून निम्न उपसा जलसिंचन व निम्न प्रवाही सिंचन योजना प्रस्तावित करून ती मंजूरही करण्यात आली होती. पूर्वीच्या योजनेत खेड तालुक्यातील कडधे, कहाणेवाडी बुद्रुक, मोहकल, कमान, चास, पापळवाडी, मिरजेवाडी ही गावे समाविष्ट होती, तर आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी, कोल्हारवाडी, थुगाव, माळवाडी, भावडी, कारेगाव, पेठ, पारगाव आदी सातगाव पठारांवरील गावांचा समावेश होता. पुढील काळात या योजनेत खेड तालुक्यातील वरुडे, पुर, कनेरसर व वाफगाव या गावांचा वाढीव समावेश करण्याची मागणी आमदार सुरेश गोरे यांनी करून योजना तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी केली होती. याशिवाय शिरूर तालुक्यातील पाबळ परिसरासह थिटेवाडी बंधाराही या योजनेत समाविष्ट करून घेऊन त्यात पाणी आणण्याची मागणी जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्षा जयश्री पलांडे व पाणी हक्क परिषदेचे अध्यक्ष परमेश्वर चौधरी यांनी केली होती. याबाबत चौधरी यांनी मागील वर्षी उपोषणही केले होते. याच पार्श्वभूमीवर याप्रश्नी जलसंपदामंत्री गिरीश महाजन मंत्रालयात बैठक बोलाविली होती. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक एस. व्ही. धोटे, मुख्य अभियंता ता. ना. मुंडे, अधीक्षक अभियंता एच. टी. धुमाळ, कार्यकारी अभियंता सुनील प्रदक्षणे, व्ही. एन. लोंढे आदी प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत संपूर्ण योजनेची माहिती घेऊन महाजन यांनी या योजनेचा सुधारित प्रस्ताव पुढील दोन महिन्यांत सादर करण्याचे आदेश दिले. दरम्यान, दोन महिन्यांनंतर होणाऱ्या बैठकीत या योजनेची प्रत्यक्ष कार्यवाही करण्यासाठी कामाची निविदा प्रक्रियाही त्याच बैठकीत करून पुढील सहा महिन्यांत प्रत्यक्ष काम सुरू होईल, अशी ग्वाहीही या वेळी महाजन यांनी दिली. बैठकीला खासदार शिवाजी आढळराव; आमदार सुरेश गोरे, जयसिंग एरंडे, जयश्री पलांडे, अरुण गिरे, रवींद्र करंजखिले, परमेश्वर चौधरी, अशोकराव पलांडे, समाधान डोके, सुनील बाणखेले, पंचायत समिती सदस्या शीतल तोडकर, अशोक बाजारे, भाऊसाहेब सावंत, सोपान जाधव, गोविंद साकोरे व शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)