भोर : शहरातील एकेरी वाहतूक, घनकचरा व्यवस्थापन, प्रलंबित असलेला औद्योगिक वसाहतीचा प्रश्न, पाणीटंचाई, विविध योजनांची अंमलबजावणी होत नाही आणि भोर तालुका पर्यटन म्हणून जाहीर करावा, शहरातील अतिक्रमणे, अशा विविध महत्त्वाच्या विषयावर जोरदार चर्चा होऊन आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, शहर व तालुक्यातील विविध प्रश्न, राजकीय मतभेद बाजूला ठेवून ‘लोकमत’च्या माध्यमातून एकत्रितरीत्या सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला.येथील पंचायत समितीच्या सभागृहात ‘लोकमत आपल्या दारी ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठल शिंदे, माजी सभापती रणजित शिवतरे, कॉ. ज्ञानोबा घोणे, नगरसेवक यशवंत डाळ, माजी नगराध्यक्ष अॅड. जयश्री शिंदे, दिलीप बाठे, भगवान कंक, प्रमोद कुलकर्णी, सीमा तनपुरे, रेखा टापरे, नितीन धारणे, कुणाल धुमाळ, प्रशांत जाधव, राहुल दिघे, सुदाम ओंबळे, पंडित गोळे, भीमराव शिंदे, मनीषा राजिवडे, सुनंदा गायकवाड, गीतांजली शेटे, दिलावर पटेल, विठ्ठल टिळेकर, पल्लवी फडणीस, तुकाराम रोमण, सूर्यकांत माने, सिद्धार्थ टापरे, शिवभक्त व नागरिक उपस्थित होते.प्रलंबित औद्योगिक वसाहत, तालुका पर्यटन म्हणून घोषित करावा, भीषण पाणीटंचाई, महाड-पंढरपूर रोड साईटपट्ट्या, वाहतूककोंडी, विविध योजनांची अंमलबजावणी होत नाही. अशा अनेक प्रश्नांवर चर्चा झाली.प्लॅस्टिकचा वापर थांबवावाशहरात प्लॅस्टिकचा वापर बंद केला आहे. तरी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा वापर केला जातो. नळांना तोट्या नसल्याने पाणी वाया जाते. नाला सफाई होत नाही, ती करण्याची मागणी पल्लवी फडणीस यांनी केली. यावर माजी नगराध्यक्षा जयश्री शिंदे म्हणाल्या, की प्लॅस्टिक बंदी करण्यात आली आहे. तसा ठरावही करण्यात आला आहे. त्यामुळे कचरा व प्लॅस्टिक रस्त्यावर टाकू नका, सफाईचे काम सुरू असून, लवकरच पूर्ण केले जाईल. पार्किंगची सोय करावीभोर शहरात एसटी स्टॅँडवर वाहतूककोंडीमुळे अपघात घडतात आणी संपूर्ण शहरात वारंवार वाहतुकीची कोंडी होते. याकडे भोर पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. त्यासाठी पार्किंगची सोय करण्याची मागणी सीमा तनपुरे यांनी केली.४भोर तालुक्यातील डेरे येथील दोन शिक्षकांची मॅच्युअल बदली करण्यात आली. मात्र, दुसरे शिक्षक येण्याअधीच शिक्षकांना सोडल्याने शाळेवर अद्याप शिक्षकच नाही. त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे.४भोर तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई सुरू असून, दोन टॅँकर सुरू आहेत. टंचाई कक्ष स्थापन केला नसून, ९० टक्के अधिकारी पुण्यात राहात आहेत. टॅँकर सुरू करण्यासाठी जायचे कुणाकडे, त्यामुळे सर्वच अधिकारी मुख्यालयात राहिले पाहिजे; अन्यथा कारवाईची मागणी भगवान कंक यांनी केली आहे.
मतभेद बाजूला ठेवून प्रश्न सोडवणार
By admin | Updated: May 23, 2016 01:51 IST