शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

लाळगेवाडी शाळेस ठोकले टाळे

By admin | Updated: November 27, 2014 23:10 IST

लाळगेवाडी (ता. दौंड) परिसरातील प्राथमिक शाळा गेल्या तीन ते चार महिन्यांपासून एकाच शिक्षकावर सुरूआहे.

कुरकुंभ : लाळगेवाडी (ता. दौंड) परिसरातील प्राथमिक शाळा गेल्या तीन ते चार महिन्यांपासून एकाच शिक्षकावर सुरूआहे. याबाबत पंचायत समितीकडे वारंवार दुस:या शिक्षकाची मागणी करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थ व व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी शाळेला टाळा ठोकला.
येथील जिल्हा परिषद शाळा इयत्ता 1 ली ते 4 थी र्पयत आहे. या शाळेत पूर्वीपासून दोन शिक्षक कार्यरत होते.  त्यातील एका शिक्षकाची बदली गेल्या तीन ते चार महिन्यांपूर्वी झाली. तेव्हापासून या शाळेत एक शिक्षक मुलांना शिकवत आहेत. याबाबत ग्रामस्थ आणि व्यवस्थापन समितीने गटशिक्षणाधिकारी संगीता शिंदे यांच्याकडे लेखी कळविले होते. परंतु याकडे अद्याप लक्ष देण्यात आले नाही. यामुळे एकाच शिक्षकाला इयत्ता 1 ली ते 4 थीर्पयतच्या मुलांना शिक्षण द्यावे लागत असल्याने अतिरिक्त ताण पडत आहे. तसेच मुलांचा वेळेवर अभ्यासक्रम पूर्ण होत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याच्या व्यतिरिक्त या शिक्षकाला निवडणूक व कार्यालयीन कामकाज व अन्य कामे करावी लागत आहेत. परिणामी लाळगेवाडी गावातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 
या वेळी माजी सरपंच हरिदास लाळगे, भानुदास गरदडे, नीलेश लाळगे, दिलीप लाळगे, बापू गरदडे, दादा लाळगे, दत्ता जांबले, शिवाजी सूर्यवंशी, माजी उपसरपंच बापूराव गरगडे, ग्रामपंचायत सदस्य गणोश लाळगे व ग्रामस्थ उपस्थित होते.
(वार्ताहर)
 
4शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब गरगडे म्हणाले, की शाळेला एक शिक्षक आहे. याबाबत आम्ही गटशिक्षणाधिकारी संगीता शिंदे यांच्याकडे गेल्या आठवडय़ात लेखी अर्ज केला होता. त्या वेळी चार दिवसांत शिक्षक देतो, असे आश्वासन देण्यात आले; परंतु गेले आठ दिवस लोटले, तरी शिक्षक मिळाला नसल्याने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. तेव्हा येथून पुढे मुलांच्या होणा:या शैक्षणिक नुकसानीस  शिक्षण विभाग जबाबदार राहील, असे शेवटी गरगडे म्हणाले.