शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

बससाठी डावी लेन ठेवा

By admin | Updated: March 14, 2016 01:32 IST

पीएमपी बस रस्त्याच्या मध्यभागातून जातात. त्या रस्त्याच्या मध्येच थांबल्याने अनेकदा अपघात होण्याची शक्यता असते़ तसेच मागील वाहनांना पुढे जाण्यास जागा राहत

पुणे : पीएमपी बस रस्त्याच्या मध्यभागातून जातात. त्या रस्त्याच्या मध्येच थांबल्याने अनेकदा अपघात होण्याची शक्यता असते़ तसेच मागील वाहनांना पुढे जाण्यास जागा राहत नसल्याने वाहतूककोंडी होते़ यामुळे बससाठी खास रस्त्याच्या डाव्या बाजूला एक लेन करावी, असा प्रस्ताव मनसेचे पुष्पा कनोजिया व राजू पवार यांनी शहर सुधारणा समितीमध्ये दाखल केला आहे.शहरामध्ये बस व इतर वाहनांसाठी लेन सिस्टिम नाही. यामुळे बसेस व इतर वाहने रस्त्यावर मिळेल त्या बाजूने जातात. अनेकदा बस मध्यभागातून जातात. बसथांबा जवळ आल्यावर अचानक डाव्या बाजूला वळतात. रस्त्याच्या डाव्या बाजूला इतर वाहने असल्यास बस मध्यभागी थांबवली जाते. तसेच बस थांब्याच्या पुढे किंवा मागे बस थांबवली जाते. कर्वे रोडवर पीएमपीने काही दिवस डाव्या बाजूने बस नेण्याचा प्रयोग राबविला होता़ त्याला चांगले यशही आले होते़ पण, त्यात सातत्य न राहिल्याने पुन्हा या रस्त्यावरील बस कशाही जाऊ लागल्या आहेत़ बससाठी रस्त्याची डावी बाजू राखीव ठेवावी, असा प्रस्ताव शहर सुधारणा समितीमध्ये सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव अभिप्रायसाठी पालिका प्रशासनाकडे पाठवला आहे. प्रशासनाचा अभिप्राय आल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. याबाबत मनसेच्या नगरसेविका पुष्पा कनोजिया यांनी सांगितले की, बस रस्त्यामध्ये कोठेही थांबते. यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची गैरसोय होते. बस मध्यभागातून जात असल्याने वाहतूककोंडी व अपघाताच्या घटना घडतात. यामुळे बससाठी रस्त्याची डावी बाजू राखीव ठेवावी. यासाठी नियमावली करण्याची गरज आहे.