शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

केडगावला स्वच्छतागृहाचा त्रास

By admin | Updated: May 30, 2017 02:04 IST

येथील सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. सर्वप्रथम ३० हजार

लोकमत न्यूज नेटवर्ककेडगाव : येथील सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. सर्वप्रथम ३० हजार लोकसंख्या असणाऱ्या केडगावसाठी ग्रामपंचायतीने २ वर्षांपूर्वी प्रलंबित स्वच्छतागृह १२ लाख रुपये खर्चून बांधले.हे स्वच्छतागृह बाजार मैदानावर असल्याने येथे कायम वर्दळ असते. या स्वच्छतालयाचे स्त्री व पुरुष असे २ विभाग आहेत. सध्या अस्वच्छतेने या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. पुरुष स्वच्छतागृहात विल्हेवाट व्यवस्थित होत नसल्याने पाणी प्रवेशद्वारावर साचलेले दिसते. आतमध्ये प्रवेश करताच घाण व दुर्गंधीमय मुतारी दिसते. बेसिन व मुतारीचा प्रत्येक नळ तुटलेला आहे. आतमध्ये गुटखा व पान यांच्या थुंकीने परिसर अस्वच्छ आहे. एकमेव शौचालय अस्वच्छ आहे. महिलांच्या स्वच्छतागृहाची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. वास्तविक पाहता दररोज स्वीपरकडून स्वच्छतागृह स्वच्छ होणे अपेक्षित असताना ग्रामपंचायत प्रशासनाकडून नियमितपणे स्वच्छता होत नाही. त्यामुळे लोकवस्ती व सार्वजनिक ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. याशिवाय स्टेशन परिसरासाठी दररोज एक घंटागाडी असते. सध्या या घंटागाडीमध्ये कचरा साचला आहे. उर्वरित कचरा जमिनीवर पडला आहे अशी अवस्था या घंटागाडीची आहे. तांत्रिक बिघाड, चालकाचा अनियमितपणा यामुळे ही घंटागाडी बंद असते. स्टेशन परिसरात झालेली गटार योजनेचे पाणी अधूनमधून रस्त्यावर वाहताना दिसत असल्याचे चित्र आहे.खरमरीत टीका : सोशल मीडियावर टीकेचा भडीमार केडगाव येथील एका ग्रामस्थाने गेल्या आठवड्यात केडगावमधील अस्वच्छता या सदराखाली सार्वजनिक ठिकाणचे फोटो पोस्ट केले होते. या फोटोवरून प्रशासनावर केडगावमधील ग्रामस्थांनी विशेषत: युवकांनी खरमरीत टीका केली होती.करातून बाजारमैदान स्वच्छ व्हायला हवे?दर मंगळवारी केडगावला आठवडेबाजार भरतो. बाजार संपल्यावर दुसऱ्या दिवशी परिसरात असणाऱ्या कचरा शेळ्या खाताना दिसतात. वास्तविक पाहता प्रशासनाला बाजारातून कर मिळतो. या उत्पन्नातून बाजारमैदान स्वच्छ होणे गरजेचे आहे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.