शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

राजगुरुनगर येथे रंगली काव्यमैफल

By admin | Updated: June 1, 2017 01:30 IST

राजगुरुनगर येथे आयोजित काव्यवाचन स्पर्धेत राज्यातील तसेच कर्नाटक, गोवा, पंजाब, गुजरात तसेच मध्य प्रदेशातून आलेल्या ११२ कवींनी

लोकमत न्यूज नेटवर्कराजगुरुनगर : राजगुरुनगर येथे आयोजित काव्यवाचन स्पर्धेत राज्यातील तसेच कर्नाटक, गोवा, पंजाब, गुजरात तसेच मध्य प्रदेशातून आलेल्या ११२ कवींनी सहभाग घेत आपली कला सादर केली. या स्पर्धेत साताऱ्याचे शाहीर लोखंडे यांनी प्रथम, द्वितीय सूर्याजी भोसले, तृतीय सुजित काळंगे आणि चतुर्थ क्रमांक प्रकाश बनसोडे यांनी मिळवले.या वेळी कवी दशरथ यादव, धनजंय गारगोटे, शिवाजी मांदळे, उमेश गाडे, राहुल पिंगळे, गणेश तनपुरे, सूरज पानसरे मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी भेट दिली ते म्हणाले, या कार्यक्रमाचे आयोजक नेहमी वक्तृत्व स्पर्धा घेत असतात पण वक्तृत्वाप्रमाणेच नवोदित कवींना व्यासपीठ मिळावे म्हणून या लोकांनी काव्यस्पर्धचे आयोजन केले आहे. कविता समाज जीवनाचा आरसा आहे. त्यामुळे आपण कवितावाचनातून आपली प्रतिमा स्वच्छ ठेवली पाहिजे.या कार्यक्रमासाठी कवी संतोष नारायणकर, हनुमंत चांदगुडे, देवा झिंजाड, सागर काकडे, विलास हाडवळे, संदीप वाघोले यांच्याबरोबर महाराष्ट्रातील अनेक कवी, साहित्यिक, प्रकाशक उपस्थित होते. बक्षीस वितरणप्रसंगी धनंजय गारगोटे, गणेश बोत्रे, काळुराम पिंजण, संतोष दाते, रामदास घोलप, दिलीप करंडे, राजेश म्हस्के, संपत गारगोटे, शरद गोरे, दशरथ यादव, शिवाजी चाळक, मधुकर गिलबिले, सूरज पानसरे, बाळासाहेब घोंगडे यादी मान्यवर उपस्तिथ होते.कार्यक्रमाचे आयोजन शिववाख्याते शुभम गाडगे, कवी शुभम वाळुंज, सत्यवान सहाणे, संदीप पाचारणे, निखिल जगताप यांनी केले होते. प्रवीण शिंदे व स्वाती कडू यांनी सूत्रसंचालन केले.अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व हुतात्मा राजगुरू विचारमंच, राजगुरुनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय मराठी काव्यस्पर्धा २०१७ चे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात या काव्य मैफीली रंगल्या. या स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखाताई मोहिते,निर्मलाताई पानसरे, कृषी उ. बाजार समितीचे सभापती नवनाथ होले, साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रा.शरद गोरे, उपाध्यक्ष राजकुमार काळभोर, यांच्या हस्ते करण्यात आले.