शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वाळूमाफियांकडून कोतवालाचे अपहरण

By admin | Updated: February 4, 2016 01:36 IST

अवैध वाळूवाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभाग कारवाई करीत असताना पकडलेला ट्रक पोलीस ठाण्यात नेण्याच्या बहाण्याने वाळूमाफियांनी कोतवालाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला

लोणी काळभोर : अवैध वाळूवाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभाग कारवाई करीत असताना पकडलेला ट्रक पोलीस ठाण्यात नेण्याच्या बहाण्याने वाळूमाफियांनी कोतवालाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समयसूचकता दाखवून सुमारे १८ किलोमीटर पाठलाग करून त्याची सुटका केली. ट्रक चालक व मालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत.मंडल अधिकारी किशोर शिंगोटे यांनी दिलेल्या फियार्दीनुसार, सदर प्रकार १ फेब्रुवारी रोजी रात्री १०.१५च्या सुमारास उरुळी कांचन एलाईट हॉटेलसमोर घडला. यामध्ये कोतवाल श्रीरामलिंग भोसले यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. ट्रकचालक रोहिदास व मालक अनिल अंकुश शितोळे (संपूर्ण नाव पत्ता नाही) या दोघांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार तहसीलदार महेश पाटील, मंडल अधिकारी किशोर शिंगोटे यांच्यासमवेत कामगार तलाठी स्वप्निल पटांगे, योगिराज कनिचे, दाबके, अव्वल कारकून श्रीनिवास कंडेपली आदींचे महसूल पथक १ फेब्रुवारी रोजी रात्री उरुळी कांचन येथील एलाईट चौकात पुणे-सोलापूर महामार्गावर अवैध वाळूवहातुकीला आळा घालण्यासाठी कारवाई करीत होते. रात्री १०.१५च्या सुमारास सोलापूर बाजूकडून वाळूने भरलेला ट्रक (एमएच ४२-टी २३१८) आला. ट्रकचालक व मालकांकडे गाडीची कागदपत्रे व वाळूबाबत चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. म्हणून त्यांना ट्रक उरुळी कांचन दूरक्षेत्रात घेण्यास सांगितले. या वेळी कोतवाल श्रीरामलिंग भोसले हे ट्रकमध्ये बसले. ट्रकचालकाने ट्रक चालू केला व तो पोलीस दूरक्षेत्रात न नेता दौंडकडे भरधाव नेला.कोतवाल श्रीरामलिंग भोसले यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे लक्षात येताच महसूल पथकाने पोलिसांची ताबडतोब मदत मागितली व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना देऊन संबंधित गाडीचा पाठलाग सुरू केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सतर्कतेने बारामती विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घटना सांगून पलायन केलेले वाहन दौंड तालुक्यात असल्याचे सांगितल्याने यवत पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी गायकवाड संबंधित वाहनाचा शोध घेऊ लागले. पलायन केलेल्या वाहनाचा सहजपूर फाटा, नंतर नांदूर गावमार्गे खामगाव, नागवडे हद्दीपर्यंत महसूल विभागाच्या पथकाने पाठलाग सुरूच ठेवल्याने चालक व अन्य एक जण वाहन सोडून शेतातून पळून गेले. ट्रकचा पाठलाग सुरू केला तेव्हा सुमारे १८ किलोमीटर आपला पाठलाग होत आहे, हे लक्षात येताच ट्रकचालक व मालकाने ट्रक दौंड तालुक्यातील खामगाव (नागवडे) येथे उभा केला व ते अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. अर्धा तासाच्या पाठलागानंतर अपहरण करण्यात आलेले कोतवाल श्रीरामलिंग भोसले हे सुखरूप आहेत, हे पाहून महसूल पथकाने सुटकेचा नि:श्वास सोडला. आज दुसऱ्या चालकाच्या मदतीने तो ट्रक उरुळी कांचन दूरक्षेत्राच्या आवारात आणून ठेवण्यात आला. (वार्ताहर)