शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कात्रज तलावाची पाहणी

By admin | Updated: December 27, 2015 02:06 IST

गेली काही वर्षे बंद असलेले कात्रज तलावातील बोटिंग लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यासाठी कात्रज तलावाची

पुणे : गेली काही वर्षे बंद असलेले कात्रज तलावातील बोटिंग लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यासाठी कात्रज तलावाची पाहणी केली असून, बोटिंग सुरू करण्याबाबत पालिका आयुक्तांना पत्रही पाठवले आहे.स्थानिक नगरसेवक वसंत मोरे यांनी यासाठी वारंवार मागणी केली, त्याकडे दुर्लक्ष होत आहे, असे लक्षात आल्यावर थेट महापालिका सभागृहात तसेच महापौरांच्या दालनात कृत्रिम बोट नेऊन आंदोलनही केले. एमटीडीसीने याबाबत हालचाल सुरू केली असून, आता महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पुढाकार घेऊन याबाबत त्वरित निर्णय घेतला, तर मुलांसाठी लवकरच नौकानयन सुरू होईल.एमटीडीसीच्या वरिष्ठ अधिकारी वैशाली चव्हाण यांनी जुन्या कात्रज तलावाच्या वर असलेल्या नव्या तलावाची यासाठी नुकतीच पाहणी केली. चव्हाण यांनी आयुक्त कुणाल कुमार यांना एक पत्रही एमटीडीसीच्या वतीने लगेचच पाठवले. त्यात त्यांनी २ व ४ आसनांच्या प्रत्येकी १० याप्रमाणे एकूण २० बोट, तसेच ५ वॉटर सायकल, ५ रो बोट , त्याचबरोबर २०० जीवरक्षक जॅकेट व बोट सोडण्यासाठी एक जेट्टी असा एकूण ५० लाख रूपयांचा खर्च यासाठी येईल, असे कळवले आहे. आयुक्तांनी आता यावर त्वरित निर्णय घेणे अपेक्षित आहे. तसे आश्वासनही आयुक्त कुणाल कुमार व महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सभागृहात दिले आहे. (प्रतिनिधी) कात्रजच्या जुन्या तलावात यापूर्वी एमटीडीसीच्या वतीने बोटिंग करण्यात येत होतेच. महापालिकेने यासाठी त्यांच्याबरोबर रितसर करार केला होता. त्यानुसार एमटीडीसी महापालिकेला वार्षिक विशिष्ट रक्कम अदा करत होती. अनेक बालगोपाल या बोटिंगचा आनंद लुटत होते. मात्र, नंतर ते बंद झाले. या तलावाच्या वर झालेल्या नव्या तलावात ते सुरू व्हावे, यासाठी मोरे प्रयत्न करीत होते, त्याला आता यश मिळते आहे.