वालचंदनगर : कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालय कुरवलीचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. या परीक्षेसाठी एकूण १०१ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३१ विद्यार्थी विशेष प्रावीण्य गटात, ३६ विद्यार्थी प्रथम श्रेणी, २७ विद्यार्थी द्वितीय श्रेणी, तर सात विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
जाधव सायली युवराज ९६.४० टक्के मिळवून प्रथम क्रमांक, पवार सुहानी रवींद्र ९३.३० टक्के हिने द्वितीय क्रमांक आणि कणसे आकाश राजेंद्र याने ९१.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, नीरा-भीमा कारखान्याचे ज्येष्ठ संचालक उदयसिंह पाटील,सचिव किरण पाटील,आॅल इंडिया चॅम्पियन नितीन माने, प्राचार्य गणेश घोरपडे यांनी अभिनंदन केले.