शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कान्होजी, संताजींच्या पुतळ्यांचे अनावरण

By admin | Updated: February 21, 2015 01:56 IST

शिवरायांना साथ देणारे सरदार कान्होजी नाईक-जेधे व गनिमी कावा युद्धनीती धुरंधर, अजिंक्य सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पुतळयाचे अनावरण

पुणे : स्वराज्यनिष्ठा वेळोवेळी प्रकट करणारे आणि शिवरायांना साथ देणारे सरदार कान्होजी नाईक-जेधे व गनिमी कावा युद्धनीती धुरंधर, अजिंक्य सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पुतळयाचे अनावरण युवराज शहाजीराजे, संभाजीराजे छत्रपती, आमदार शशिकांत शिंदे, आमदार दिलीप मोहिते व शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक-अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या हस्ते झाले.अनावरण प्रसंगी बोलताना शहाजीराजे म्हणाले, ‘‘सरदार कान्होजी जेधे व सरसेनापती संताजी घोरपडे या दोन थोर स्वराज्य सेनानींचा श्री शिवछत्रपतींनी स्थापिलेल्या स्वराज्य रक्षण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. ह्या शूरवीरांच्या गौरवशाली इतिहासाला न्याय देणारे अतिशय सुंदर पुतळे बनविल्याबद्दल जेधे आणि घोरपडे कुटुंबीयांचे अभिनंदन करण्यात आले. कान्होजी जेधे यांच्या पुतळयाची उंची तब्बल ८ फूट आहे. पुतळा बनविण्यासाठी नीलेश राजाराम जेधे आणि दिग्विजय सर्जेराव जेधे तर, संताजींचा पुतळा साकारण्यात रोहित घोरपडे आणि गिरीश घोरपडे यांनी मेहनत घेतली. (प्रतिनिधी)२०१४ मध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळयाचे अनावरण होऊन सुरू झालेली प्रथा ह्या वर्षी २०१५ लाही ह्या दोन थोर वीरांच्या पुतळा अनावरणाने सुरूच राहिली आणि पुढच्या वेळेस अनेक स्वराज्यवीरांचे पुतळ्यांचे अनावरण स्वराज्यरथ सोहळ्यामध्ये होईल आणि हा सोहळा वैशिष्टयपूर्ण ठरेल.- अमित गायकवाड, अध्यक्ष, शिवजयंती महोत्सव समिती