शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
2
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
3
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
4
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
5
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
6
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
7
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
8
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
9
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
10
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
11
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
12
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
13
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
14
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
15
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
16
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
18
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
19
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
20
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू

कदमवाकवस्ती महिला सरपंचांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे लसीकरण दरम्यान झालेल्या शाब्दिक बाचाबाचीचे पर्यावसान भांडणात झाल्याने ते ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे लसीकरण दरम्यान झालेल्या शाब्दिक बाचाबाचीचे पर्यावसान भांडणात झाल्याने ते सोडवण्यासाठी गेलेल्या महिला सरपंचांना शिवीगाळ करून त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच त्यांचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना कदमवाकवस्ती येथे घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी एकास अटक केली आहे.

याप्रकरणी सरपंच गौरी चित्तरंजन गायकवाड (वय ४०, रा. पांडवदंड रोड, कदमवाकवस्ती) यांनी दिलेल्या फिर्याद दिली. त्यानुसार सुजित सुभाष काळभोर (वय ३३, रा. कदमवाकवस्ती) याला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.३) कदमवाकवस्तीमध्ये आरोग्य विभागाच्या वतीने एंजल हायस्कूल, माळवाडी जिल्हा परिषद शाळा व कदमवस्ती जिल्हा परिषद शाळा येथे कोविड-१९ लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. लसीकरण सुस्थितीत पार पाडण्यासाठी सरपंच गौरी गायकवाड या एंजल हायस्कूल, संभाजीनगर येथे उपस्थित होत्या.

११ वाजण्याच्या सुमारास सुजित काळभोर हा तेथे आला. त्यावेळी तेथे उपस्थित असणारा अविनाश ऊर्फ पप्पू बडदे यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. सुजित काळभोर याने अविनाशच्या कानाखाली मारली. हे पाहून सरपंच या नात्याने त्यांच्यातील वाद मिटविण्यासाठी गायकवाड तेथे गेल्या असता त्यांनाही सुजित याने शिवीगाळ करत कानाखाली मारून जमिनीवर पाडले. त्यानंतर लसीकरणासाठी आलेल्या महिलांनी गायकवाड यांना सुजितच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना न जुमानता त्याने सरपंचाचा डाव्या हाताला धरून विनयभंग केला.

सुजित काळभोर याने दिलेल्या फिर्यादीनुसार, सकाळी लसीकरणासाठी गेला असता पप्पू बडदे त्याला तू थांब म्हणाला यावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर तेथे सरपंच गौरी गायकवाड आल्या त्यांनी कानशिलात लगावल्याने हाणामारी झाली. हे पाहून तेथे सचिन अरविंद काळभोर, महेश ज्ञानेश्वर काळभोर हे आले व सर्वांनी त्यास हाताने मारहाण केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमृता काटे या करत आहेत.