शहरं
Join us  
Trending Stories
1
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
2
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
3
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
4
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
5
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
6
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
7
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन
8
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी, 'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
9
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
10
अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?
11
IND vs WI 2nd Test Day 4 Stumps : मॅच टीम इंडियाचीच! पण चौथ्या दिवशी वेस्ट इंडिज टीम जिंकली
12
२३ मुलांचे बळी घेणाऱ्या 'श्रेसन फार्मा'चा परवाना रद्द; ३०० वेळा उल्लंघन करणाऱ्या कंपनीला ठोकलं टाळं
13
सौदीत जाऊन योगी आदित्यनाथांबद्दल आक्षेपार्ह फोटो केला पोस्ट, अखेर तावडीत सापडलाच
14
म्हणून त्याला किंग खान म्हणतात! 'लापता लेडीज' फेम अभिनेत्रीला ड्रेसमुळे चालताच येईना, शाहरुखची 'ती' कृती प्रेक्षकांना भावली
15
भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न'
16
मतचोरीची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका, न्यायमूर्तींनी दिला मोठा निर्णय, सुप्रिम कोर्टात काय घडलं?
17
टाटा-इन्फोसिससह 'हे' शेअर्स आपटले; सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा लाल रंगात; 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
18
चीननंतर अमेरिकेने सुरू केली भारताची हेरगिरी; पाळत ठेवण्यासाठी 'ओशन टायटन'ला पाठवले, कारण...
19
"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
20
DSP सिराज नंबर वन! झिम्बाब्वेच्या गड्याला टाकले मागे; पण इथं टॉप ५ मध्ये दिसत नाही बुमराहचं नाव

बस-टेम्पोची धडक; दोन्ही वाहने जळून खाक

By admin | Updated: October 23, 2015 00:08 IST

बस व टेम्पो यांची समोरासमोर धडक होऊन दोन्ही गाड्यांनी पेट घेतला. सुमारे तासभर या गाड्या रस्त्याच्या मधोमध पेटत उभ्या होत्या. त्यामध्ये दोन्ही वाहने जळून खाक झाली

पेठ : बस व टेम्पो यांची समोरासमोर धडक होऊन दोन्ही गाड्यांनी पेट घेतला. सुमारे तासभर या गाड्या रस्त्याच्या मधोमध पेटत उभ्या होत्या. त्यामध्ये दोन्ही वाहने जळून खाक झाली असून गाड्यांचे आता फक्त सांगाडेच उरले आहेत. ही घटना पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पेठ गावच्या हद्दीत बुधवारी रात्री ११ वाजता घडली. या अपघाताची तिव्रता एवढी होती की, दोन्ही गाड्यांची धडक होताच क्षणातच त्यांनी पेट घेतला. गाड्या पेटल्यामुळे पुणे - नाशिक महामार्गावरील वाहतूक पेठ गावातून जाणाऱ्या रस्त्याने वळविण्यात आली. घडलेल्या अपघातात अमोल मारुती मुळे, बस चालक दिलीप बजाबा पवार (दोघे रा.मांजरवाडी) व अमित अर्जुन खोकराळे (रा.हिवरे तर्फे नारायणगाव, ता.जुन्नर) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मंचर येथे एका खासगी दवाखान्यात औषध उपचार सुरु आहेत. टेम्पो चालकाचे नाव समजू शकले नाही. पेठ गावाजवळ पुणे - नाशिक महामार्गावर बुश कंपनीचे कामगार चाकणला नेणाऱ्या बसला (एम. एच. १४, सी. डब्लू. २८७६) राजगुरुनगरहून भरधाव आलेल्या टेम्पोची धडक बसली. त्यामुळे दोन्ही वाहनांनी पेट घेतला. अपघातात बसमध्ये अडकलेल्या बसचालकास बाहेर पडण्यासाठी तेथे थांबलेल्या ग्रामस्थांनी मदत केली. मात्र नंतर आगीची तिव्रता एवढी वाढली की कोणालाही ती आग विझवता येणे शक्य झाले नाही. ही घटना मंचर पोलिसांना समजल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनिल गोडसे, सहाय्यक फौजदार आय. ए. सय्यद व इतर पोलिस घटनास्थळी आले. तिन्ही जखमींना मंचर येथे उपचारासाठी दाखल केले.