शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘माय मराठीच्या लेकी’चा स्त्रीशक्तीचा जागर

By admin | Updated: June 21, 2017 06:17 IST

विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजवलेल्या स्त्रीशक्तीचा जागर, अडाणी असूनही जीवनाचे तत्वज्ञान मांडणाऱ्या बहिणाबाई, मराठीतील पहिली कवयित्री म्हणून गणल्या जाणाऱ्या मुक्ताबार्इंपासून

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजवलेल्या स्त्रीशक्तीचा जागर, अडाणी असूनही जीवनाचे तत्वज्ञान मांडणाऱ्या बहिणाबाई, मराठीतील पहिली कवयित्री म्हणून गणल्या जाणाऱ्या मुक्ताबार्इंपासून मोगुबाई कुर्डीकर, सुधा करमरकर असा स्त्रीशक्तीचा प्रवास प्रेक्षकांसमोर उलगडत गेला. पुरुषप्रधान संस्कृतीला छेद देत ‘ती’ने घेतलेली गरुडझेप नृत्य, गायन, वादनाच्या माध्यमातून मूर्त स्वरूपात अवतरली.निमित्त होते, विद्या सहकारी बँकेच्या ४३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित चौरंग निर्मित अशोक हांडे आणि कलाकारांच्या संचाने सादर केलेल्या ‘माय मराठीच्या लेकी’ या अनोख्या गीत-संगीत आणि नृत्यमय कार्यक्रमाचे. सुमारे १५०-२०० कलाकारांचा सहभाग असलेल्या या कार्यक्रमातून स्त्रीने आकाशाला घातलेली गवसणी, तिने सर्व क्षेत्रे पादाक्रांत करत सिद्ध केलेले अस्तित्व उलगडत गेले. ‘जय शारदे वागेश्वरी’ या गाण्याने कार्यक्रमाचा श्रीगणेशा झाला. मुक्ताबार्इंची ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’, ‘मुंगी उडाली आकाशी’, जनाबार्इंचे ‘दळिता कांडिता’, जिजाऊंचे ‘निज निज रे शिवराया’, अहल्याबाई होळकरांचे कर्तृत्व सांगत सादर झालेले ‘श्रमिक हो घ्या इथे विश्रांती’, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी गाजवलेला पराक्रम अशी गाथा सादर झाली. सावित्रीबाई फुले यांनी रोवलेली शिक्षणाची मुहुर्तमेढ युवतीने नाटिकेतून सादर केली. एकीकडे स्त्री गरुडझेप घेत असताना दुसरीकडे नाचगाण्यातून उदरनिर्वाह करणाऱ्या कलावंतीणीचे जीवनही या कार्यक्रमातून रेखाटण्यात आले. शास्त्रीय संगीतात मोगूबाई कुर्डीकरांपासून किशोरी आमोणकर, अश्विनी भिडे-देशपांडे, तसेच विजया मेहता, सुधा करमरकर यांचे कार्यकर्तृत्व, मराठी चित्रपटातील नायिकांचा प्रवास ‘देव जरी मज’, ‘मन शुद्ध’, ‘ऐरणीच्या देवा तुला’, ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’, ‘आता कशाला उद्याची बात’ अशा गाण्यांमधून प्रेक्षकांसमोर उभा राहिला. संपदा जोगळेकर यांनी ‘ती फुलराणी’ मधील स्वगत सादर केले. प्रीती वारियार या केरळी तरुणीने सुमधुर आवाजाने सर्वांची मने जिंकली. यावेळी डिफेन्स अकाऊंट, कॉसमॉस, म्युनिसिपल सर्व्हंट्स, पुणे अर्बन, पुणे मर्चंटस, राजगुरुनगर सहकारी, मुस्लिम को-आॅप बँक, जनता सहकारी, पुणे पीपल्स, गणेश सहकारी, वालचंदनगर सहकारी आणि बारामती सहकारी बँकांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा गौरव करण्यात आला. सेनापती बापट रस्ता शाखेला सर्वोत्कृष्ट शाखा पुरस्काराने मिळाला. अरविंद खळदकर यांनी मनोगत व्यक्त केले. अनास्कर यांनी प्रास्ताविक केले.