शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जून-जुलैत पाणीकपातीची धास्ती

By admin | Updated: February 4, 2016 01:43 IST

तीन महिन्यांपासून दिवसाआड पाणीकपातीचा समाना करणाऱ्या पुणेकरांचे पाणी संकट आणखी वाढणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दौंड आणि इंदापूर या

पुणे : तीन महिन्यांपासून दिवसाआड पाणीकपातीचा समाना करणाऱ्या पुणेकरांचे पाणी संकट आणखी वाढणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दौंड आणि इंदापूर या तालुक्यांतील गावांना पिण्यासाठी पाणी देण्यात आल्यानंतर मे महिन्यात या गावांसाठी आणखी तेवढेच आवर्तन देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मे महिन्यात देण्यात येणारे हे जादा पाणी वाचविण्यासाठी यापुढे दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाकडून पालिकेला देण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, महापालिकेने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मे महिन्यात हे पाणी सोडले गेल्यास पुणेकरांना दिवसाआड पाणी न देता तीन दिवसांनी पाणी देण्याची वेळ येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.काय आहे अडचण ?महापालिकेकडून गेल्या तीन ते चार महिन्यांपासून शहराला दिवसाआड पाणी देण्यात येत आहे. त्यातच महापालिकेची वितरणव्यवस्था कमी आणि काही तांत्रिक अडचणी असल्याने आठवड्यात कोणत्याही एका दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला, तर त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास तीन दिवस लागतील. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या प्रस्तावानुसार, एक दिवस पाणी बंद ठेवून शहराला दर तीन दिवसांनंतर पाणी द्यावे लागेल; अन्यथा एक दिवस पूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे.कालव्याला असलेली गळती १ टीएमसी धरल्यास प्रत्यक्षात फेब्रुवारी ते जुलैअखेरपर्यंत ६ महिने पालिकेला प्रत्यक्षात ५ ते ५.५० टीएमसी पाणीच मिळणार आहे. महापालिकेला धरणातील साठा कमी पडण्याची शक्यता असल्याने सध्या दिवसाआड सुरू असलेली कपात वाढविण्याशिवाय पर्याय राहणार नाही. काय आहे पाटबंधारे विभागाचे गणित ?पाटबंधारे विभागाकडून मे महिन्यातही या दोन तालुक्यांतील पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्यात पाणी सोडल्यानंतर धरणात शिल्लक राहणारे पाणी पुणे शहराला जुलैअखेरपर्यंत दिवसाआड दिले, तरच पुरेल. मे महिन्यासाठी पाणी दिल्यास पाणीकपात वाढवावी लागणार आहे. त्यामुळे ही कपात टाळायची असेल, तर या महिन्यापासूनच आठवड्यातून एकदा संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा पालिकेने बंद ठेवावा, असा प्रस्ताव पाटबंधारे विभागाकडून महापालिकेसमोर ठेवण्यात आला आहे. हे पाणी बंद ठेवल्यास जुलैअखेरपर्यंत महापालिकेला दीड टीएमसी पाणीबचत करता येईल आणि बचत झालेले पाणी जिल्ह्यासाठी सोडत येईल.