शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘मॉन्सून’ कमकुवत असल्याने ‘जुलै’ने वाढविला ‘ताप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:08 IST

काही दिवस तापमान वाढणार : दशकातील दुसऱ्या क्रमांकाच्या कमाल तापमानाची नोंद विवेक भुसे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मॉन्सून ...

काही दिवस तापमान वाढणार : दशकातील दुसऱ्या क्रमांकाच्या कमाल तापमानाची नोंद

विवेक भुसे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मॉन्सून कमकुवत असल्याने आकाशात ढगांचे आच्छादन नाही. त्यामुळे सूर्यनारायणाची किरणे थेट जमिनीवर येत आहे. त्यामुळे एरवी असलेल्या सरासरी तापमानापेक्षा पुणे शहराचे जुलै महिन्यामधील तापमान उच्च राहिले आहे. गेल्या ८ दिवसांत ते सरासरीपेक्षा अधिक राहिले असून गेल्या दशकातील दुसऱ्या क्रमाकांच्या कमाल तापमानाची नोंद आताच झाली आहे.

पुणे शहरात एप्रिल महिन्यांचा अखेर आणि मे महिन्याच्या सुरुवातीला कमाल तापमानाची प्रामुख्याने नोंद होत असते. यंदा उन्हाळा जास्त तापदायक ठरला नाही. मात्र, पावसाने ओढ दिल्याने जुलै महिन्यातील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत साडेचार अंश सेल्सिअसने वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे दिवसा उन्हाळ्याप्रमाणे उकाडा जाणवत आहे. जुलै महिन्यातील आठ दिवसांतील कमाल तापमान प्रथमच इतके सलग अधिक राहिले आहे.

चौकट

जुलैतील सर्वाधिक कमाल तापमान (अंश सेल्सिअस)

५ व ७ जुलै २०२१ - ३३.५

८ जुलै २०१७ - ३१.३

१३ जुलै २०१५ - ३२.२

१ जुलै २०१४ - ३४.४

३ जुलै २०१२ - ३३.४

१ जुलै २००९ - ३३.०

चौकट

जुलै महिन्यातील सर्वाधिक कमाल तापमान - १२ जुलै १९६६ - ३६.० अंश सेल्सिअस

चौकट

पुणे शहरात जुलै महिन्यात सरासरी कमाल तापमान २९.३ अंश सेल्सिअस इतके असते. पुणे शहरात ५ व ७ जुलै २०२१ रोजी कमाल तापमान ३३.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. याबाबत हवामान शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, तसेच पाहिले तर हा उन्हाळ्याचाच महिना असतो. मात्र, या काळात आपल्याकडे मॉन्सून स्थिरावलेला असतो. आकाशात ढगांचे आच्छादन असते. त्यामुळे सूर्याची किरणे थेट जमिनीपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे जुलै महिन्यात आल्हाददायक वातावरण असते. सूर्य २१ जूनला कर्क वृत्तावर असतो. त्यानंतर काही दिवसांनी त्याची प्रखरता उत्तरेकडे वाढत जाते. त्यामुळे आपल्याकडे उत्तर भारतात या काळात कमाल तापमान वाढते असते. सध्या अमेरिका, कॅनडामध्ये उष्णतेची लाट आलेली दिसते. तेथे उष्णतेमुळे शेकडोचे बळी गेले आहेत. याचवेळी आपल्याकडे मॉन्सून सक्रिय असल्याने उष्णतेचा परिणाम दक्षिणेकडे होताना दिसत नाही. ऑक्टोबरमध्येही मॉन्सून गेलेला असल्याने आपल्याकडे ऑक्टोबरमध्ये उष्णता जाणवते. त्याला आपण ऑक्टोबर हिट म्हणतो. सध्या मॉन्सून कमकुवत आहे. आकाशात ढगांचे आच्छादन नाही. जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे सूर्याची किरणे थेट येतात. सूर्य दुपारी डोक्यावर आल्यानंतर त्याची सर्वाधिक कमाल तापमान २ तासांनी जास्त जाणवते. ही स्थिती या आठवड्यात अशीच राहणार असून मॉन्सून सक्रिय झाल्यानंतर कमाल तापमानात घट होईल.

चौकट

सध्या मॉन्सून सक्रिय नसल्याने आकाश निरभ्र आहे. त्यामुळे कर्क वृत्तावर असलेल्या सूर्याची थेट किरणे जमिनीवर येत असल्याने कमाल तापमानात वाढ झाली आहे. मॉन्सून सक्रिय झाल्यानंतर पुढील आठवड्यात कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ