शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहरात सिव्हिल इंजिनिअरना मिळेना नोकरी

By admin | Updated: April 23, 2016 00:32 IST

औद्योगिक, आर्थिक मंदी व राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा परिणाम अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य शाखेच्या विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटवर झाल्याचे चित्र शहरातील महाविद्यालयांत दिसत आहे.

पिंपरी : औद्योगिक, आर्थिक मंदी व राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा परिणाम अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य शाखेच्या विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटवर झाल्याचे चित्र शहरातील महाविद्यालयांत दिसत आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत २०१५ - १६ या शैक्षणिक वर्षात शहरातील महाविद्यालयांतील कॅम्पस इंटरव्ह्यूत निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांत सुमारे ३० ते ४० टक्के घट झाली असल्याचे चित्र आहे. कन्स्ट्रक्शन उद्योग हा कृषी क्षेत्राखालोखाल रोजगार निर्मिती करणारा उद्योग आहे. तर सेवा क्षेत्रानंतर या क्षेत्रात सर्वाधिक परकीय गुंतवणूक करण्यात आलेली आहे. शहर व परिसरातील गृहनिर्माण संस्थांत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने मागील काही वर्षांपासून स्थापत्य शाखेतून अभियांत्रिकीची पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या होत्या. तसेच चांगले व आकर्षक पॅकेज विद्यार्थ्यांना मिळत होते. परंतु, यंदाच्या राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विविध गृहनिर्माण संस्थांची कामे बंद झाली आहेत. तसेच आर्थिक मंदीमुळे उपलब्ध असणाऱ्या फ्लॅट्सना मागणी कमी असल्याने बांधकामे रखडलेल्या अवस्थेत आहेत. तसेच स्टीलचे उत्पादन व चीनच्या मंदीचा थेट परिणाम या क्षेत्रावर झाल्याचे दिसून येत आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक गृहनिर्माण प्रकल्पांच्या कामावर बंदी घालण्यात आली. (प्रतिनिधी)इतर शाखांना मागणीअभियांत्रिकीच्या इतर शाखांच्या तुलनेत स्थापत्यशाखेतील विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट न होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. तुलनेत माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, मेकॅनिकल शाखेतील विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटचे प्रमाण अधिक आहे. पायाभूत सुविधा प्रधान करणारे प्रकल्प (रस्ते, धरण, विमानतळ, बंदरे) व गृहनिर्माण प्रकल्पात स्थापत्यशास्त्रातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात.