शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या आमिषाने घातला गंडा

By admin | Updated: April 24, 2017 05:09 IST

परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ६५ जणांची ५९ लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या ग्लोबल स्टार मॅनेजमेंट

पुणे : परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ६५ जणांची ५९ लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या ग्लोबल स्टार मॅनेजमेंट या कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरला सहकारनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने २७ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश रविवारी दिले. भावनेशकुमार जस्सूभाई पटेल (वय ३९, जय विजय ए, दर्शनी चौक, लोढा कॉर्नर, सहकारनगर) असे आरोपीचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तो कुटुंबासह फरार झाला होता. गुन्हे शाखेचे निरीक्षक अप्पासाहेब वाघमळे यांनी त्याच्या तपासासाठी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार त्याला शनिवारी दुपारी अटक करण्यात आली.मोहन विष्णू देठे (वय ३०, धोंडेवाडी, पंढरपूर) यांनी याबाबत फिर्याद दिली होती. गेल्या फेब्रुवारीपासून आॅक्टोबरपर्यंत फसवणुकीचा प्रकार सुरू होता. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला होता. पटेल याने नोकरी लावण्याच्या आमिषाने स्वीकारलेले पैसे स्वत:च्या बँकेत भरले आहेत. त्याची त्याने काय विल्हेवाट लावली, तो मुख्य आरोपीच्या संपर्कात आहे का, हे तपासण्यासाठी मोबाईलचे कॉल रेकॉर्ड तपासायाचे आहे. मुख्य आरोपीचा ठावठिकाणा शोधायचा आहे, त्यासाठी त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सहायक सरकारी वकील एस. जे. बागडे यांनी मागितली. न्यायालयाने ५ दिवसांची कोठडी मंजूर केली. (प्रतिनिधी)