शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

...हा तर जिझिया कर

By admin | Updated: April 1, 2017 02:33 IST

महापालिकेचे आगामी (२०१७-१८) या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर करताना प्रमुख रस्त्यांवरील पार्किंगला शुल्क

पुणे : महापालिकेचे आगामी (२०१७-१८) या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर करताना प्रमुख रस्त्यांवरील पार्किंगला शुल्क आकारण्याचा प्रस्ताव हा पुणेकरांवर लादलेला जिझिया करच असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने  केली आहे. स्थायी समितीने हा  प्रस्ताव फेटाळून लावावा, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. शहरातील रस्त्यांवर धावणारी खासगी वाहने कमी करण्यासाठी प्रमुख रस्त्यांवरील पार्किंगला शुल्क लावण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी अंदापत्रकामध्ये मांडला आहे. नागरिकांनी खासगी वाहने वापरू नयेत, यासाठी व्यवस्था केली जात असताना सार्वजनिक वाहतूकव्यवस्था मात्र सक्षम नाही. शहरातील पीएमपी बस भरून वाहत आहेत, त्याच वेळी खासगी वाहनांच्या वापरावरही निर्बंध आणणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे मनसेचा त्याला ठाम विरोध आहे, असे गटनेते वसंत मोरे यांनी सांगितले.सध्या महापालिकेच्या मालकीच्या पार्किंगच्या जागा या व्यावसायिक लोकांचे अड्डे बनले आहेत. त्याचबरोबर रस्त्यावरही पर्किंगला शुल्क लागू केल्यास तिथेही असाच प्रकार घडू शकेल. पार्र्किं गच्या ठेकेदारांकडून मनमानी पद्धतीने नागरिकांकडून शुल्क वसूल केले जाईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)महापालिका प्रशासनाकडून यापूर्वीही रस्त्यावरच्या पार्किंगला शुल्क लावण्याचा प्रस्ताव मांडण्यात आले होते. मात्र, मुख्य सभेने ते एकमताने फेटाळून लावले. आता स्वतंत्र पार्किंग धोरण तयार करून ते मांडण्यात आले आहे. स्थायी समितीकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.