शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीत विरोधी काम केलेल्या जित्राबांना पक्षात पुन्हा प्रवेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:11 IST

इंदापूर : विधानसभा निवडणुकीत काहींनी निष्ठा बाजूला ठेवून विरोधकांचे काम केले. अशा जित्राबांना पक्षात पुन्हा प्रवेश नाही, असा स्पष्ट ...

इंदापूर : विधानसभा निवडणुकीत काहींनी निष्ठा बाजूला ठेवून विरोधकांचे काम केले. अशा जित्राबांना पक्षात पुन्हा प्रवेश नाही, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

इंदापूर येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या तालुका कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना अजित पवार यांनी तुफान टोलेबाजी केली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता टीका करताना ते म्हणाले, जे भाजप शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले आहे अशा राजकीय पक्षात इंदापूरचा एक नेता जातो हे दुर्दैव आहे. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये बऱ्याच लोकांना भाजप निवडून येईल, असा चुकीचा अंदाज होता. म्हणून आजच्या स्टेजवर बसलेल्या लोकांनी वेगळी कामे केली. जर एक दिलाने काम केले असते तर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधातील उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले असते.

राष्ट्रवादीतून बाहेर गेलेले अप्पासाहेब जगदाळे यांच्यावर टीका करताना पवार म्हणाले, जिल्हा बॅँक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतिपद अशी पदे जनतेची कामे करण्यासाठी दिली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत काहींनी निष्ठा बाजूला ठेवून विरोधकांचे काम केले. ते जिकडे जातील तिकडचा पराभव होतो. त्यांचा पायगुणच तसा आहे. अशा जित्राबांना आता पक्षात प्रवेश नाही. यांनी कितीही नाही म्हणू द्या, मी नाहीच घ्यायचो म्हणतो. फक्त मला कुस्ती करायला लावून तुम्ही कपडे सांभाळू नका. तुम कुश्ती करो, हम कपडे सांभालेंगे असे नाही झाले पाहिजे.

आता आपल्याला नवी टीम तयार करायची आहे. मला पण ३० वर्षे राजकारणात झाली आहेत. त्यावेळी माझ्यासोबत तरुणांची टीम होती. तुम्ही काही काळजी करू नका. फक्त निर्व्यसनी राहा. ह्या बोटाची थुंकी त्या बोटावर करू नका. टोप्या फिरवून नका. दिलेला शब्द पाळा आणि शब्दाचे पक्के राहा. पवारसाहेबांशी एकनिष्ठ राहा.

इंदापूर शहरवासीयांनी नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात दिली तर विकासच करून दाखवतो. नाहीतर नावाचा अजित पवार नाही असा शब्द देखील त्यांनी दिला. ते म्हणाले, इंदापूर तालुक्याची पंचायत समिती आपल्या ताब्यात नसताना देखील, जिल्हा परिषदेतील महत्त्वाची सभापतिपदे आपण इंदापूर तालुक्याच्या वाट्याला नेहमी दिलेले आहेत. त्यामुळे यंदा इंदापूर पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसची आली पाहिजे. राज्याचे ग्रामविकास मंत्री व पंचायत समिती संदर्भात निधी देणारी सर्व यंत्रणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराची आहे. त्यामुळे गावातील कोणीही गाफील न राहता इंदापूर पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराची निर्माण करा.