शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांची समिती घेणार झाडाझडती

By admin | Updated: February 10, 2016 03:19 IST

आमदारांच्या पंचायतराज समितीने केलेल्या झाडाझडतीनंतर आता लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांची अत्यंत महत्त्वाची असलेली संसदीय स्थायी समिती जिल्ह्याला भेट देत आहे.

पुणे : आमदारांच्या पंचायतराज समितीने केलेल्या झाडाझडतीनंतर आता लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांची अत्यंत महत्त्वाची असलेली संसदीय स्थायी समिती जिल्ह्याला भेट देत आहे. विशेष म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष पाहणीसाठी बारामती तालुक्याची निवड केली आहे. १0 वर्षांनंतर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात पंचायतराज कमिटी आली होती. या कमिटीने जिल्हा परिषदेला मोठा दणका दिला होता. हलगर्जीपणा,अनियमितता आणि सरकारी निधीचा अपव्यय, नियमबाह्य काम या प्रकरणी ठपका ठेवून सुमारे १७ जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचे निलंबन, ४0 जणांवर फौजदारी, १३३ आणि १३७ कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली होती. त्यांनी सन २0१0-११ या वर्षांतील लेखापरीक्षण अहवालावर सुनावणी घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानंतर आता ३१ खासदारांचा सहभाग असलेली संसदीय समिती १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पुण्यात येत असून, १५ फेबु्रवारीला ते बारामतीला भेट देणार आहेत. ही समिती केंद्रपुरस्कृत योजनांचा लेखाजोखा तपासणार आहे. आता ही ३१ खासदाराची संसदीय स्थायी समितीही फक्त बारामतीलाच भेट देणार आहे. यात लोकसभेचे खासदार शिशिर अधिकारी, कीर्ती आझाद, रेणुका बुट्टा, हरिश्चंद्र चव्हाण, बिरेनसिंह एंग्टी, विजय कुमार हन्सदक, अजय मिश्रा (टेनी), मनशंकर निनामा, मोसम नूर, डॉ. महेंद्रनाथ पांडे, प्रल्हादसिंह पटेल, डॉ. रमेश पोखरीयाल, गोकाराजू गंगा राजू, डॉ. अंबुमणी रामडॉस, जुगलकिशोर शर्मा, डॉ. यशवंत सिंह, नराामली शिवप्रसाद, बालका सुमन, लाडूकिशोर स्वैन, अ‍ॅड. चिंतामण वांगा. तर राज्यसभेचे खासदार मंकद अली, गुलाम बाल्यावी, डी. बंडोपाध्याय, राम नरेन दुदी, रणविजयसिंग जुदेव, अश्विनी कुमार, महेंद्रसिंह म्हारा, डॉ. विजयलक्ष्मी साधो, ए.के. सेल्वराज, कनकलता सिंह आदी ३१ जणांचा समावेश आहे.बारामती कृषी विज्ञान केंद्राबरोबर येथील चार गावांना भेटी देऊन केंद्रपुरस्कृत ग्रामविकासाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा लेखाजोखा ते घेणार आहेत. आता ही समिती पंचायतराज समितीप्रमाणे काय कारवाई करणार, अशी दबक्या आवाजात चर्चा जिल्हा परिषद अधिकाऱ्यांत सुरू आहे. सहा महिने फक्त समित्या आणि समित्यासप्टेंबर महिन्यात पंचायतराज कमिटी आली. ती येत असल्याने अगोदर महिना-दोन महिने तयारीत व येऊन गेल्यानंतर महिना साक्ष देण्यात गेला. त्यानंतर १ फेबु्रवारीला महिलांची हक्क कल्याण समिती येऊन गेली. आता संसदीय स्थायी समिती येत असून, त्यानंतर २३ फेबु्रवारी रोजी विधिमंडळाची अनुसूचित जमाती समिती भेट देणार आहे.