शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रभागातच प्रकल्प उभारून जिरवा कचरा

By admin | Updated: December 23, 2014 05:39 IST

उरुळी देवाची येथे कचरा टाकू देण्यास ग्रामस्थांनी दिलेली ३१ डिसेंबरची डेडलाइन, शहराबाहेर कचरा टाकू देण्यास सर्वच ग्रामपंचायतींकडून होत

पुणे : उरुळी देवाची येथे कचरा टाकू देण्यास ग्रामस्थांनी दिलेली ३१ डिसेंबरची डेडलाइन, शहराबाहेर कचरा टाकू देण्यास सर्वच ग्रामपंचायतींकडून होत असलेला जोरदार विरोध, या पार्श्वभूमीवर प्रभागातला कचरा प्रभागातच जिरविण्यावर भर देण्याच्या पर्यायाकडे सभासदांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत लक्ष वेधले. सध्या सुरू असलेले २२ बायोगॅस प्रकल्प अधिक गतीने चालवून आणखीन नवे प्रकल्प उभारण्यात यावेत, अशी मागणी या वेळी करण्यात आली.कोंढवा-हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कचरा संकलनाचे आऊटसोर्सिंग करण्यासाठी ३० लाखांचा निधी मंजूर करण्याचा प्रस्ताव सभेपुढे ठेवण्यात आला होता. या वेळी गंभीर होत चाललेल्या कचरा प्रश्नावर सभासदांनी लक्ष वेधले. कचरा संकलनासाठी कामगार पुरविणाऱ्या ठेकेदारांकडून कामगारांचे मोठ्या प्रमाणात शोषण करण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरही सभासदांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.वसंत मोरे म्हणाले, ‘‘२०११ साली माझ्या प्रभागामध्ये बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आला. दिवसाला ६ ते ८ टन कचरा येथे जिरविला जातो. त्याचबरोबर काही लाइटही तेथील ऊर्जेवर चालविले जात आहेत. इतर प्रभांगामध्येही बायोगॅसचे असे प्रयोग राबविले जाणे आवश्यक आहे.’’ शहरामध्ये २२ बायोगॅस प्रकल्प चालविले जात आहेत. आवश्यक ओल कचरा कमी येणे, स्थानिक लोकांकडून प्रकल्पासाठी विरोध होणे अशा गोष्टी घडत असल्याचे राजेंद्र जगताप यांनी स्पष्ट केले. कचरा संकलनासाठी ठेकेदारांकडून कामगार पुरविले जातात. मात्र ठेकेदारांकडून त्यांना नियमाप्रमाणे वेतन न देता निम्माच पगार दिला जातोय याकडे सिद्धार्थ धेंडे यांनी लक्ष वेधले. ठेकेदार त्याच्याकडे कमी सेवक असल्याचे दाखवून त्यांचा पीएफ भरण्यास टाळाटाळ करीत असल्याचे सुभाष जगताप यांनी सांगितले. सफाईच्या कामाचे आऊटसोर्सिंग नियमानुसार करता येत नसल्याचे सुधीर जानजोत यांनी सांगितले. काही ठेकेदारांची मोनोपॉली होत असल्याकडे आप्पा रेणुसे यांनी लक्ष वेधले. या आऊटसोर्सिंगवर महापालिकेचे नियंत्रण राहते का, याबाबत मंजुषा नागपुरे यांनी शंका उपस्थित केली. ठेकेदारांकडील कामगार कधी कामाला येतात, त्याने रजिस्टर दाखविले का, कामगार प्रत्यक्ष कामावर हजर असतात का, यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे त्यांनी सांगितले. कंत्राटी कामगारांना साडेअकरा हजार रुपये वेतन देण्याची मागणी वनिता वागस्कर यांनी केली. महापालिकेकडून ठेकेदारांना ५० कोटी रुपये दिले जातात, त्याऐवजी महापालिकेने पूर्वीप्रमाणे रोजंदारीवर कामगार कचरा संकलनासाठी घ्यावेत, अशी सूचना उपमहापौर आबा बागुल यांनी केली. (प्रतिनिधी)