शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

दागिने लंपास करणारा गजाआड

By admin | Updated: April 10, 2017 02:57 IST

कात्रज परिसरात सोन्याचे बनावट दागिने दाखवून सोन्याचे खरे दागिने हातचलाखीने लंपास करणाऱ्या

पुणे : कात्रज परिसरात सोन्याचे बनावट दागिने दाखवून सोन्याचे खरे दागिने हातचलाखीने लंपास करणाऱ्या चोरट्यास गजाआड करण्यात भारती विद्यापीठ ठाण्याच्या पोलिसांना यश आले.सुरेश दयाभाई परमार (वय ३४, आशीर्वाद प्रोजेक्ट, फ्लॅट नं. ६०३, करंजावडे, सेक्टर ५, पनवेल, रायगड) असे आरोपीचे नाव असून, त्याचा साथीदार जिक्या काळे (सांगली) पसार झाला आहे. तोसुद्धा सराईत गुन्हेगार आहे. परमार गुजरातचा मूळ रहिवासी असून, त्याने पारधी समाजातील महिलेशी लग्न केले आहे. पारधी लोकांबरोबर राहुनच  गुन्हे केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.पुढे गर्दी आहे, दागिने काढून ठेवा, असे सांगून महिला आणि वृद्धांना दागिने काढण्यास सांगून बनावट दागिने हातचलाखीने देणे, एखाद्या महिलेची पर्स लांबविणे, कोणाला स्वस्तामध्ये दागिने विकण्याचे आमिष दाखविणे अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी गुन्हे केले असून, ठिकाणे बदलत राहण्याच्या पद्धतीमुळे त्याने अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या.हवालदार प्रदीप गुरव यांना ५ तारखेला आरोपींबाबत माहिती मिळाली. कात्रज-आंबेगाव भागात बतावणी करून हातचलाखीने फसवणूक करून चोऱ्या करणारे दोघे कात्रज-कोंढवा रस्त्यावरील पुलाखाली थांबले आहेत, त्यांच्याकडे बनावट दागिने असून ते गुन्हा करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती मिळाल्याने फौजदार उत्तम बदगुडे यांना सांगितली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती कळविण्यात आल्यानंतर, पथकासह पुलाजवळ छापा घालण्यात आला. परमार याची झडती घेतली असता बनावट सोन्याच्या ९ अंगठ्या व मण्यांची पिवळ्या धातूची माळ आढळून आली.प्रदीप गुरव, विनोद भंडलकर, गणेश सुतार, श्रीधर पाटील, समीर बागसिराज, बाबासाहेब नरळे यांनी ही कामगिरी केली. (प्रतिनिधी)परमार याने बतावणी करून फसवणूक केल्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून साडेतीन लाख रुपये किमतीचे १०० ग्रॅम दागिने जप्त करण्यात आले आहेत. भारती विद्यापीठ ठाण्याच्या हद्दीत झालेले ५ गुन्हे उघड झाले आहेत. त्याला १० तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून, त्याची घरझडती घेतली असता बनावट सोन्याच्या आणखी २१ अंगठ्या व ४ पाटल्या मिळून आल्या आहेत.