शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पूजेच्या बहाण्याने दागिने लंपास

By admin | Updated: December 24, 2016 00:49 IST

मालकाने पाठवल्याची बतावणी करीत सुट्ट्याचे बंदे करून घेण्याच्या तसेच पूजा घालण्याच्या बहाण्याने हातचलाखीने ६७ हजारांचा

पुणे : मालकाने पाठवल्याची बतावणी करीत सुट्ट्याचे बंदे करून घेण्याच्या तसेच पूजा घालण्याच्या बहाण्याने हातचलाखीने ६७ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला. ही घटना बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. याबाबत सुभाष पवार (वय ६४, रा. स्वामी समर्थनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ३० ते ४० वयोगटातील अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार गेल्या १५ वर्षांपासून तुळशीबागेतील जान्हवी मॅचिंग्ज दुकानामध्ये काम करतात. बुधवारी सकाळी त्यांच्या दुकानात आलेल्या व्यक्तीने आपल्याकडे सुट्टे असून, रवीशेठ यांनी पाठवल्याचे सांगितले. शंभर रुपयांच्या नोटा घेऊन दोन हजारांची नोट देण्यास त्याने सांगितले किंवा ५० रुपयांच्या दोन नोटा देण्यास सांगितले. त्याच्याकडून १०० रुपयांची नोट घेतल्यावर त्यांनी ५० रुपयांच्या दोन नोटा दिल्या. त्यानंतर त्याने आपल्याला पूजा करायची असल्याचे सांगत पवार यांच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट आणि हातातील दोन अंगठ्या मागितल्या. हा ऐवज ५० रुपयांच्या नोटेला लावून परत देतो, असे सांगताच पवार यांनी दागिने काढून दिले. आरोपीने हे दागिने नोटेच्या पुडीमध्ये बांधून ही पुडी दुकानाच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्याचे नाटक केले. हातचलाखी करून हे दागिने घेऊन चोरटा पसार झाला.