शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा चांदीचे दागिने लुटणारे जेरबंद

By admin | Updated: February 16, 2016 01:33 IST

भरदिवसा दोन पिस्तुलाचा धाक दाखवून चांदीचे दागिने लुटणाऱ्या चौघांना जेरबंद करण्यात मंचर पोलिसांना यश आले. या टोळीचा म्होरक्या शहरातील एक

मंंचर : भरदिवसा दोन पिस्तुलाचा धाक दाखवून चांदीचे दागिने लुटणाऱ्या चौघांना जेरबंद करण्यात मंचर पोलिसांना यश आले. या टोळीचा म्होरक्या शहरातील एक सोने-चांदीचा दुकानदार निघाला असून मुंबईमधील दोन शार्पशूटर सहभागी झाले होते. चांदीचे दागिने व एक पिस्तुल, मोटारसायकल गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. अवघ्या एका दिवसात पोलिसांनी तपास लावला. आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. मुख्य आरोपी अनिल सुभराव शिंदे (वय २९) मयूर भरत विभूते (वय २४, दोघे रा. आटपाडी, ता. व जि. सांगली) शार्पशूटर वैभव दशरथ पिंगट (वय २१), अनिकेत लक्ष्मण अमराळे (वय २४, दोघे रा. भांडुप, मुंबई) यांना पोलिसांनी अटक केली आहे. अनिल शिंदे यांनी गणेश बांगर यांच्यासोबत मंचर शहरात श्रेया ज्वेलर्स सोन्या-चांदीचे दुकान सुरू केले. बांगर साडेतीन महिन्यांपासून बाहेरगावी होते. कर्जबाजारी झाल्याने अनिल शिंदे याने चोरीचा प्लॅन आखला. अनिलने मयूर विभूते याला दुकानात कामाला ठेवले होते, तसेच मुंबईतील शार्पशूटर वैभव पिंगट व अनिकेत अमराळे यांना पिस्तुलांसह बोलावून घेतले. सुखदेव सावंत सकाळी दागिने घेऊन येतात, हे माहीत असल्याने पाळत ठेवून हा प्रकार करण्यात आला. मंचर बसस्थानकावर पिंगट व अमराळे आल्यावर मयूर विभूते यांनी त्यांना मोटारसायकलवरून संभाजी चौकात सोडले. (एमएच १४ डीपी ५४५९) या पल्सरवरून विभूते दुकानाकडे पाहणी करीत गेला. सावंत दुकानात आल्याचे पाहून विभूते याने दोघा शार्पशूटरना डोळ््याचा इशारा देऊन तो शिवाजी चौकात जाऊन उभा राहिला. वैभव पिंगट व अनिकेत अमराळे संभाजी चौकमार्गे बाजारपेठेतून पायी जात त्यांनी सुखदेव सावंत यांच्यावर पिस्तुल रोखले. पिस्तुलानेच मारहाण करून त्यांना जखमी केले. चांदीच्या दागिन्यांची बॅग घेऊन दोघे पळत शिवाजी चौकात आले. वेशीजवळ स्थानिक तरुण अनिकेत सोमवंशी याने दोघांना हटकलेही. दोघे चोरटे पळत जाऊन मयूर विभूते याच्या मोटारसायकलवर बसले व त्यांनी धूम ठोकली व त्या वेळी सोमवंशी व जीतू बाणखेले यांनी त्यांचा पाठलाग केला. पुणे-नाशिक महामार्गावर पारगाव फाटा येथे मुख्य सूत्रधार अनिल शिंदे चारचाकी गाडी घेऊन आला. तेथे वैभव पिंगट, अनिकेत अमराळे या दोघा शार्पशूटरना व दागिने घेऊन ते सांगली व तेथून मुंबईला गेले. विभूते दुचाकी घेऊन माघारी आला. शहरातील दोन ठिकाणच्या सीसीटीव्हीत चोरटे दिसून आले. शिवाय अनिकेत सोमवंशी याने मोटारसायकलचा नंबर टिपल्याने पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे आले. नंबरबद्दल आरटीओकडे चौकशी केली असता सांगली, पिंपळगाव व पुणे येथील ६ गाड्या निष्पन्न झाल्या. त्यातील गणेश बांगर यांच गाडीवरून माग निघाला. बांगरची गाडी मयूर विभूते वापरत होता. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांनी रात्रीचा सापळा रचून विभूते याला दुचाकीसह जेरबंद केले. त्याने इतरांची नावे सांगितली. (प्रतिनिधी)