शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

शंभरावर घरफोड्या करणाऱ्या ‘जयड्या’कडून १३ लाखांचे दागिने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:11 IST

पुणे : शहराच्या विविध भागांत घरफोडी करणाऱ्या सराईत घरफोडी चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून ...

पुणे : शहराच्या विविध भागांत घरफोडी करणाऱ्या सराईत घरफोडी चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून १२ लाख ६० हजार रुपयांचे २८ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

जयवंत गोधर्वन गायकवाड ऊर्फ जयड्या (वय ३२, रा. आंबेडकरवस्ती, औंध) असे अटक केलेल्याचे नाव आहे़

गुन्हे शाखेचे युनिट ५ चे अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना कारागृहातून सुटलेला आरोपी जयवंत गायकवाडने मोठी घरफोडी केली असून, तो सोलापूरला जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती हवालदार अजय गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने शिवाजीनगर गावठाणात घरफोडी केल्याची कबुली दिली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तपासणी केली असताना २२ मार्चला शिवाजीनगर गावठाणात घरफोडी करुन १२ लाख ६० हजार रुपयांचे २८ तोळे सोन्याचे लंपास केले होते. सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे अधिक तपास करीत आहेत. ही कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, प्रमोद टिळेकर, दीपक लांडगे, रमेश साबळे, दयाराम शेगर, संजय दळवी, स्नेहल जाधव यांच्या पथकाने केली.

चौकट

‘रेकॉर्ड’वरील सराईत गुन्हेगार

जयवंत ऊर्फ जयड्या गायकवाड हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. गायकवाडने शहराच्या वेगवेगळ्या भागांत घरफोड्या केल्या असून, आतापर्यंत त्याने शंभरापेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे केले आहेत. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रेम वाघमारे व त्यांच्या पथकाने त्याला नोव्हेंबरमध्ये अटक केली होती. त्या वेळी त्याच्याकडून तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले होते. या गुन्ह्यांतून तो नुकताच जामिनावर बाहेर आला. त्यानंतर त्याने शिवाजीनगरमध्ये घरफोडी केली. परंतु, त्यातील दागिन्यांची विल्हेवाट लावण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला पुन्हा पकडून चोरलेला ऐवज हस्तगत केला.