शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरी नगरपालिका कंत्राटी कामगारांचे उपोषण

By admin | Updated: May 5, 2017 02:05 IST

जेजुरी नगरपालिकेच्या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या आरोग्य विभागातील सुमारे ४५ ते ५० सफाई कर्मचाऱ्यांनी विविध

जेजुरी : जेजुरी नगरपालिकेच्या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या आरोग्य विभागातील सुमारे ४५ ते ५० सफाई कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुणे जिल्हा मजदूर संघाचे चिटणीस बाळासाहेब भुजबळ यांच्यासह नगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. याबाबत मजदूर संघाच्या वतीने पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.गेल्या २० ते २५ वर्षांपासून ठेकेदारी पद्धतीने सलगपणे शहराची साफसफाई करणाऱ्या कामगारांना कामावर न घेतल्याच्या निषेधार्थ आरोग्य विभागातील सफाई कामगार विशेषत: महिला कामगारांनी काल बुधवार (दि. ३) पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यावर्षी नगरपालिकेकडून अथर्व एंटरप्रायझेस, वाई यांना ठेका देण्यात आला आहे. यामध्ये पाणीपुरवठा, कार्यालय (आस्थापना) वीज, अग्निशामक, आरोग्य साफसफाई आदी कामांसाठी हा ठेका आहे. ठेका घेतल्यानंतर संबंधित ठेकेदाराने काही सफाई कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले असल्याची उपोषणकर्त्यांची तक्रार आहे.कंत्राटी पद्धतीने असले तरी गेल्या २० वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर घ्यावे. सर्व कामगारांना भविष्य निर्वाह निधी व विमा संरक्षण मिळावे,सर्वांना किमान वेतनासह वेतनचिठ्ठी ,पगारी सुट्या मिळाव्यात. सुरक्षिततेचे सर्व साधन कामगारांना मिळावे, आदी मागण्या करीत सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मागील महिन्यात मजदूर संघाचे चिटणीस बाळासाहेब भुजबळ यांनी मुख्याधिकारी समीर भूमकर, नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांच्याशी याबाबत चर्चा करूनही मार्ग निघाला नसल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. पाणीपुरवठा, लाइट, अग्निशामक व कार्यालयातील कंत्राटी कर्मचारी व्यवस्थितरीत्या कार्यरत असल्याने व्यवस्थापकाने सांगितले. कंत्राटी कामगारांच्या उपोषणाबाबत मुख्याधिकारी समीर भूमकर यांच्याकडून माहिती घेतली असता ठेकेदार, संबंधित कामगार व मजदूर संघाचे चिटणीस भुजबळ यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. ठेका विविध कामांचा काढला जातो, कामगारसंख्येचा नाही. ठेकेदाराने किती माणसे लावून काम करून घेतले, याच्याशी नगरपालिकेचा संबंध येत नाही. कंत्राटी कामगारांना कामावर ठेवण्याबाबत व विविध मागण्यांची बाब नगरपालिका प्रशासनाच्या अखत्यारीत येत नाही. नगरपालिकेने संबंधित कामांचा ठेका दिला त्यावेळी ठेकेदाराने किती माणसांकडून काम करून घ्यावे हा त्याचा प्रश्न आहे. मात्र, विविध कामांसाठी नेमण्यात आलेल्या कामगारांचा मानवतेच्या दृष्टिकोनातून विचारविनिमय करून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे मुख्याधिकारी भूमकर यांनी सांगितले.गेले दोन दिवस कामगार उपोषणाला बसलेले आहेत, मात्र पालिका प्रशासन याकडे दुर्लक्षच करीत आहे. या दोन दिवसांत आमच्या उपोषणाला समाजातील विविध संघटना व मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, प्रशासन ढीम्मच असल्याने उद्या (दि.५) सकाळी १०.३० वाजता पालिकेचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांना घेराव घालणार असल्याचे संघाचे चिटणीस बाळासाहेब भुजबळ यांनी सांगितले.(वार्ताहर)स्थानिक कामगारांना डावलून परप्रांतीय कामगार ठेवल्याने स्थानिकांवर अन्याय होत असल्याचे पत्रकात नमूद केले आहे.याबाबत नगरपालिकेची ठेकेदार असलेली अथर्व एंटरप्रायझेस फर्मच्या व्यवस्थापकांशी चर्चा करून माहिती घेतली असता, आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या कुणालाही कामावरून कमी केलेले नाही स्वत:च्या मर्जीनुसार काहींनी काम सोडले आहे. त्यामुळे शहराची साफसफाई अत्यावश्यक सेवा असल्याने दुसरे कामगार बोलावत काम करून घेतले आहे.मुळातच हा ठेका ई-टेंडरिंगनुसार उक्ता म्हणजेच ९९ लाख ७ हजार २०० रुपयांना घेतला आहे, तर मागील ठेकेदाराने हाच ठेका त्यावेळी १ कोटी २८ लाख रुपयांना घेतला होता. या ठेक्यामध्ये कामगारांची किती संख्या असावी ही बाब नमूद नव्हती तसेच ठेकेदारीमध्ये जुनेच कामगार ठेवावेत हे बंधन नाही. तरीही मागील ठेकेदार जे वेतन कर्मचाऱ्यांना देत होता तेच वेतन आम्हीही देण्यास तयार आहोत. उपोषण फक्त आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी सुरु केले आहे.