शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जेईई निकालाचा कट आॅफ घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 06:21 IST

सीबीएसईकडून इंजिनीअरिंग कॉलेजांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई (जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन) मेन्स परीक्षेचा निकाल सोमवारी सायंकाळी जाहीर झाला

मुंबई/पुणे : सीबीएसईकडून इंजिनीअरिंग कॉलेजांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई (जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन) मेन्स परीक्षेचा निकाल सोमवारी सायंकाळी जाहीर झाला. यंदा पहिल्यांदाच जेईईचा कटआॅफ खूप घसरल्याचे दिसून येत आहे.या परीक्षेत आंध्र प्रदेशच्या विजयवाड्याचा सुरज कृष्णा भोगी देशात पहिला आला आहे. पुण्याचा शरद भट देशात ३१ वा तर अर्णव दातार ४१ वा आला. जेईई मेन्सची भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित विषयांची ३६० गुणांची परीक्षा ८ एप्रिलला झाली होती. तर, आॅनलाइन परीक्षा १५ आणि १६ एप्रिल रोजी झाली होती. २४ एप्रिल रोजी याची आन्सर की जाहीर करण्यात आली होती.यासाठी कटआॅफ सर्वसाधारण गटासाठी ७४ तर इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी (ओबीसी) ४५, अनुसूचित जाती (एससी) २९ आणि अनुसूचित जमातींकरिता (एसटी) २४ असा घसरला आहे. जेईई मेन्सचे तिन्ही पेपर खूपच अवघड होते, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते.जेईई मेन्स परीक्षेसाठी देशभरातून १० लाख ४६ हजार विद्यार्थी बसले होते, यानुसार जेईई-अ‍ॅडव्हान्सकरिता दोन लाख ३१ हजार २४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यातील शरद भट, अर्णव दातार, अनुज श्रीवास्तव (६६), चिन्मय भारती (१९७) यांनी रँक प्राप्त केली.महाराष्टÑातून दीड लाख विद्यार्थ्यांनी जेईई मेन्सची परीक्षा दिली होती, त्यापैकी ३० हजार विद्यार्थी पुण्यातील होते. त्यापैकी १ हजार विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. ज्या उमेदवारांनी आॅनलाइन, तसेच आॅफलाइन परीक्षा दिली होती, ते आपला निकाल अधिकृत वेबसाइट ६६६.ूु२ी१ी२४’३२.ल्ल्रू.्रल्ल वर पाहू शकणार आहेत. यातील एकूण २,३१,०२४ विद्यार्थी जेईई-अ‍ॅडव्हान्स या दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरले आहेत.