शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जेईई, नीट, नेट परीक्षा- २०२४ चे वेळापत्रक जाहीर, 3 आठवड्यात निकाल हाेणार जाहीर

By प्रशांत बिडवे | Updated: September 19, 2023 16:31 IST

अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी संयुक्त पूर्व परीक्षा जेईई तसेच वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश चाचणी (नीट युजी ) परीक्षा देण्यासाठी देशभरातून माेठ्या संख्येने विद्यार्थी तयारी करीत असतात....

पुणे : राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) तर्फे पुढील वर्षी हाेणाऱ्या जेईई, नीट, सीयुईटी आणि नेट परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी संयुक्त पूर्व परीक्षा जेईई तसेच वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश चाचणी (नीट युजी ) परीक्षा देण्यासाठी देशभरातून माेठ्या संख्येने विद्यार्थी तयारी करीत असतात.

देशभरात राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या वतीने देशभरात महत्वाच्या प्रवेश परीक्षांचे आयाेजन केले जाते. त्यासाठी या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाते. देशातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच आयआयटीमध्ये प्रवेशासाठी जेईई परीक्षेला खूप महत्व आहे. ऑनलाईन माध्यमातून या परीक्षा हाेतात. जेईई परीक्षेचा पहिले सेशन दि. २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी आणि दुसरे सेशन दि. १ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत होणार आहे. तर वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट परीक्षा ५ मे २०२४ राेजी नियाेजित आहे.देशातील केंद्रीय विद्यापीठांमधील पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी संयुक्त विद्यापीठ प्रवेश परीक्षा (सीयुईटी युजी) दि. १५ ते ३१ मे दरम्यान होईल. तर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठीची (सीयुईटी पीजी) परीक्षा दि. ११ ते २८ मार्च या कालावधी घेतली जाईल. प्राध्यापक हाेण्यासाठी महत्वाची असलेली युजीसी नेट परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर झाले असून ही परीक्षा दि. १० ते २१ जून दरम्यान परीक्षा होणार आहे. परीक्षांविषयी अधिक माहितीसाठी https://nta.ac.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. नाेंदणीप्रक्रिया सुरू झाल्यानंतर परीक्षांविषयी सविस्तर प्रसिद्ध केली जाईल.

तीन आठवड्यात निकाल जाहीर हाेणार-

परीक्षा समाप्त झाल्याच्या दिवसापासून पुढील तीन आठवड्यांत निकाल जाहीर केले जातील. तसेच नीट परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाईल असेही एनटीएच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालexamपरीक्षाHSC / 12th Exam12वी परीक्षा