शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पिकांवर वनविभागाचा जेसीबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 03:04 IST

अतिक्रमणावर हातोडा : पूर्वसूचना न देताच इंदापूरमध्ये कारवाई

निमसाखर : (ता. इंदापूर) येथे सामाजिक वनविभागाने शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता अतिक्रमणे काढण्याची कारवाई करत शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातूनच जेसीबी मशिन फिरवली. अगोदरच अडचणीत असलेला शेतकरी आपली पिके कशीबशी वाचवत असताना या कारवाईमुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.

निमसाखर येथे सामाजिक वनीकरणाचे नीरा नदीलगत मोठे क्षेत्र आहे. त्यापैकी काही क्षेत्र हे वीर धरणग्रस्तांना देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी नदीच्या बाजुने सर्व्हे करून हद्द नियोजित करण्यात आली होती. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी पुन्हा सर्व्हे नंबरच्या बांदाने सर्व्हे करून अचानक पण कोणतीही पूर्वसूचना शेतकऱ्यांना न देता सुमारे २५ जेसीबी मशिन मोठा फौजफाटा व पिंजरा घेऊन येऊन वनविभागाने ही कारवाई केली.सुरुवातीला नदीच्या बाजुने केलेला सर्व्हे का बदलण्यात आला व नव्याने केलेल्या सर्व्हे नंबरच्या बांधाच्या सर्व्हेनुसार कारवाई का करण्यात आली? याबाबत शेतकºयांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असून यामागे कोणाचा हात तर नाही ना? अशी शंकाही शेतकºयांमधून उपस्थित होत आहे.

गेली कित्येक पिढ्या या जमिनी आम्ही कसत असून सात-बाराच्या उताºयाप्रमाणे आम्हाला आमच्या जमिनी ताब्यात मिळाव्यात ही जमीन म्हणजे नुसती जमीन नाही तर आमची आणि आमच्या लेकरा बाळाची आई हाय अशी आर्त हाक या ठिकाणचा शेतकरी देत आहे. त्यामुळे वास्तविक पाहता नदीच्या बाजूने हा सर्व्हे करून वनविभागाने त्यांची जमीन हस्तांतरित करावी व शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी येथील शेतकºयांमधून करण्यात येत आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून वनविभागाच्या जागेतून अवैधरीत्या रस्ते काढून वाळूउपसा केला जात होता; तसेच मुरुमाची चोरी होत होती. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला, त्या वेळी हे खाते गप्प का होते, असाही प्रश्न परिसरातून विचारला जात आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग