शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जयकुमार गावडे वेगवान धावपटू

By admin | Updated: June 10, 2017 02:18 IST

पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्टतर्फे पुरस्कृत वरिष्ठ गटाच्या जिल्हा मैदानी स्पर्धेत जयकुमार गावडे याने पुरुष गटामध्ये १०० मीटर धावण्याची

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्टतर्फे पुरस्कृत वरिष्ठ गटाच्या जिल्हा मैदानी स्पर्धेत जयकुमार गावडे याने पुरुष गटामध्ये १०० मीटर धावण्याची शर्यत जिंकून वेगवान धावपटूचा मान मिळविला. महिलांत दीपिका कोटियन वेगवान धावपटू ठरली. म्हाळुंगे-बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात शनिवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत पुरुषांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत युनिक स्पोर्ट्सच्या जयकुमारेने १०.९ सेकंद वेळेसह अव्वल स्थान पटकावले. युनिक स्पोर्ट्सच्याच प्रतीक गावडेने दुसरे, तर डेक्कन जिमखान्याच्या शुभम धुमाळने तिसरे स्थान मिळवले.तिहेरी उडीत यदी स्पोर्ट्सच्या मंगेश कदमने १२.२४ मीटर कामगिरीसह बाजी मारली. बीएसएच्या नयन वाघेलाने दुसरा आणि सुलतान शेखने तिसरा क्रमांक मिळविला. गोळा फेकमध्ये बीईजीच्या बलविंदरसिंगने प्रथम क्रमांक पटकावला. बलविंदरने १४.७० मी. कामगिरी नोंदविली.महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सेंट्रल एक्साइजच्या दीपिका कोटियनने प्रथम क्रमांक पटकावला. दीपिकाने १२.०१ सेकंदांची वेळ दिली. डेक्कन जिमखान्याच्या जान्हवी येरवडेकरने दुसरा, तर पीएसएच्या तेजश्री भगतने तिसरा क्रमांक मिळविला. महिलांच्या उंच उडीमध्ये इन्कम टॅक्सच्या जुईली बधेने विजेतेपद मिळवले. जुईलीने १.६० मीटर कामगिरी नोंदविली. तिहेरी उडीत डेक्कन जिमखान्याच्या पौर्णिमा मारणेने (१०.४९ मीटर) प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धेचे उद्घाटन माजी आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलीट गुरूबन्स कौर यांच्या हस्ते आणि शिवछत्रपती पुरस्कारविजेत्या रेश्मा वनमाने यांच्या हस्ते झाले.