शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मॉरिशसच्या बांधवांचा जेजुरीत जागरण गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:02 IST

सन- १८६४मध्ये महाराष्ट्रतून जाऊन मॉरिशस येथे स्थायिक झालेल्या भोसले, गायकवाड यांच्या पाचव्या पिढीतील ३० सदस्य खंडेरायाच्या जेजुरीत आठवड्यापूर्वी आले असून, जेजुरीतील मल्हार गौतमेश्वर (छत्री मंदिर) प्रांगणात शनिवारी (दि. ७) रात्रीपासून ते रविवारी पहाटेपर्यंत या मॉरिशसवासीय मराठी बांधवांनी चक्क स्वत:च खंडेरायाचा जागरण गोंधळ घातला.

जेजुरी : सन- १८६४मध्ये महाराष्ट्रतून जाऊन मॉरिशस येथे स्थायिक झालेल्या भोसले, गायकवाड यांच्या पाचव्या पिढीतील ३० सदस्य खंडेरायाच्या जेजुरीत आठवड्यापूर्वी आले असून, जेजुरीतील मल्हार गौतमेश्वर (छत्री मंदिर) प्रांगणात शनिवारी (दि. ७) रात्रीपासून ते रविवारी पहाटेपर्यंत या मॉरिशसवासीय मराठी बांधवांनी चक्क स्वत:च खंडेरायाचा जागरण गोंधळ, तळी-भंडार, लंगर तोडणे, खंडोबाची-देवीची गाणी, जात्यावरची गाणी, भारुड सादर करीत मॉरिशसमध्येही जोपासलेल्या मराठी परंपरा व धार्मिक संस्कृतीचे जेजुरीत दर्शन घडवले.या धार्मिक विधींचे विशेष आकर्षण म्हणजे पुरुषवर्ग मराठी संस्कृतीच्या पारंपरिक वेशामध्ये, तर महिलावर्गाने नऊवारी साडी, नथ, अंबाडा असा मराठमोळा वेश परिधान केला होता, १८६४मध्ये सातारा जिल्ह्यातील पाली जवळच्या एका छोट्याशा गावातील भोसले, गायकवाड बोटीवर खलाशी म्हणून काम करत असतानाच मॉरिशसला स्थायिक झाले, त्या वेळी त्यांच्याकडे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायासह तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरच्या अंबाबाईचे टाक होते. मॉरिशसमध्ये स्थायिक या परिवारांनी आपली धार्मिक मराठी परंपरा सोडली नाही, मॉरिशसमध्येही या कुलदैवतांचे सर्व सण, उत्सव मोठ्या श्रद्धेने तेथे केले जातात. १५० वर्षांपूर्वी मराठा समाजातील आमचे पूर्वज मॉरिशस येथे स्थायिक झाले असले तरी त्यांनी येथील धार्मिक विधी, सण-उत्सवांची परंपरा जोपासली होती, तोच वारसा आम्ही पुढे चालवत आहोत. मॉरिशसची लोकसंख्या १२ लाख असून, सुमारे ३० हजार मराठी परिवार तेथे स्थायिक झालेला आहे. आमच्या कुटुंबामध्ये आषाढी, कार्तिकी एकादशी, गणपती उत्सव, महाशिवरात्री, आदी उत्सवांसह खंडोबाचे सोमवती अमावास्या, चंपाषष्ठी उत्सव साजरे केले जातात. या वेळी अनिल भोसले लक्ष्मण, मीनाक्षी भोसले लक्ष्मण, वृशांत म्हाडकर गायकवाड, मल्हारी आबाजी परब, जयश्री परब, प्रशिक शिकानंद हिरू पवार, मनीषा हिरू राघू पवार, राजेंद्र कुमार पडूं पंढरकर, हिराबाई लखना आदी मॉरिशसचे भाविक आणि श्रीमार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त शिवराज झगडे, संदीप जगताप, पंकज निकुडे पाटील, व्यवस्थापक दत्तात्रय दिवेकर आदी उपस्थित होते.मॉरिशसमध्ये फ्रेंच आणि आफ्रिका मिळून क्रिओल भाषा बोलली जात असली, तरी मराठी बांधव मात्र शुद्ध मराठीतून बोलतात. तेथील शाळेत ५० मिनिटांचा मराठीचा तास घेतला जातो, त्यामध्ये महापुरुषांचा इतिहास, मराठी देवदेवता, सण- उत्सवांचे महत्त्व आदी शिकवले जातात. भोसले यांच्या मॉरिशस येथील जगदंबे निवास या ठिकाणी खंडोबा व तुळजाभवानी मंदिर आहे. श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने छत्री मंदिरासमोर कार्यक्रमासाठी सुसज्ज मांडव, स्पीकर व्यवस्थेची सोय करण्यात आली होती.