लोकमत न्यूज नेटवर्ककाझड : बोरी येथे जपानच्या महिलांनी अभ्यास दौऱ्यासाठी बोरी गावाला भेट दिली. या वेळी त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. अभ्यासदौरा करत असताना गावातील शेतकऱ्यांची अडचण शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा, कर्ज, गावाची भौगोलिक स्थिती तसेच शेतीक्षेत्रातील मशागत, पायाभूत सुविधा, गावाची लोकसंख्या आणि द्राक्ष, केळी, डाळींब ऊस, पाळीव प्राणी तसेच शेतकऱ्यांनी पिकवेल्या मालाचे मार्केटिंग, मिळालेल्या दराची या संदर्भात संपूर्ण माहिती अभ्यास दौऱ्यांतर्गत जपानी महिलांनी घेतली.या वेळी गावातील रामहरी जगताप यांच्या द्राक्षबागेची आणि शेततळ्याची पाहणी केली. शेततळ्याची माहिती त्यांनी घेतली. तसेच जगताप यांच्या घरी महाराष्ट्रीय पदार्थांच्या मेजवानीचा आस्वाद घेतला. या वेळी पोलीस पाटील गुलाब जगताप, सोमनाथ ठोंबरे, सचिन जगताप, मनोहर ठोंबरे होते. या वेळी जपानमधील महिलांनी गावातील स्थानिक महिलांशीदेखील संवाद साधला.
बोरीत जपानच्या महिलांचा दौरा
By admin | Updated: May 11, 2017 04:08 IST