पुणो : मुळा-मुठा नदीला पुनरूज्जीवन देण्यासाठी महापालिकेकडून राबविल्या जाणा:या तब्बल 715 कोटींच्या नदीसुधार योजनेसाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (जायका) ने सहमती दर्शविली आहे. या कंपनीचे सहा ते सात प्रतिनिधी येत्या 25 ऑगस्ट पासून या प्रकल्पासाठी दोन्ही नद्यांचे सर्वेक्षण करणार आहेत.
सहा महिने हे सर्वेक्षण केले जाणार असून त्यानंतर प्रकल्पास निधी देण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. पुढील वर्षभरात हे सर्वेक्षण आणि प्रकल्पासाठीची अंतिम मान्यता होणो अपेक्षीत असल्याने मार्च 2क्15 पासून या नदीसुधार योजनेचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.
शहरात दररोज सुमारे साडेसातशे एमएलडी मैलापाणी निर्माण होते. त्यातील अवघ्या साडेतीनशे एलएलडी पाण्यावर महापालिकेस प्रक्रिया करणो शक्य झाले आहे. त्यामुळे इतर सांडपाणी थेट नदीपात्रत सोडले जाते. त्यामुळे नदीचे अस्तित्व लोप पावण्याच्या मार्गावर असून नदीला पुनरूज्जीवन देण्यासाठी महापालिकेने सुमारे 715 कोटी रूपयांच्या नदीसुधार प्रकल्पाचा आराखडा तयार केला आहे. त्यात मैलापाणी शुद्धीकरण केंद्रासह, सांडपाणी वाहून नेण्याच्या वाहिन्या, नदीसुशोभीकरण तसेच नदीचे प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पाचा खर्च महापालिकेस करणो शक्य नसल्याने पालिकेने तो राज्यशासनाच्या मदतीने केंद्राच्या राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाकडे (एनआरसीडी) पाठविला होता. त्यानुसार केंद्रशासनाकडून 5क् टक्के राज्यशासनाकडून 3क् टक्के आणि महापालिकेने 2क् टक्के खर्च या प्रकल्पासाठी करण्याचे प्रस्तावित होते.
हे काम सुरू झाल्यास, मुठा आणि मुळा नदी 1क्क् टक्के मैलापाणी मुक्त होणार आहे. त्यामुळे नदीला पुनरूत्जीवन देणारी पुणो महापालिका ही देशातील पहिली महापालिका ठरणार असल्याचा दावाही प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
(प्रतिनिधी)
4राज्यशासनाने या प्रकल्पास निधी देण्यास नकार दिला. त्यामुळे पालिकेने राज्यशासनाच्या हिश्श्याची जबाबदारीही घेण्याचा ठराव संमत करून हा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला होता. मात्र, केंद्रशासनाने निधीसाठी हा प्रकल्प जपानच्या जायका या संस्थेकडे पाठविला होता. त्याससाठी 85 टक्के निधी देण्याची तयारी जायकाने दर्शविली आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात 25 ऑगस्टपासून जायका कंपनीचे शिष्टमंडळ या दोन्ही नद्यांचे सर्वेक्षण करणार आहे. तसेच महापालिकेने सादर केलेल्या प्रकल्प आराखडय़ाची माहिती घेऊन सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल सादर करणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.