शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

होळीला जपा सामाजिक बांधिलकी

By admin | Updated: March 23, 2016 01:27 IST

फाल्गुन शुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर साजरा केला जाणारा सण म्हणजे होळी. होळीच्या मुहूर्तावर शेणाच्या गोवऱ्या, झाडाच्या फांद्या पेटवून अग्निदेवतेची पूजा केली जाते.

पुणे : फाल्गुन शुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर साजरा केला जाणारा सण म्हणजे होळी. होळीच्या मुहूर्तावर शेणाच्या गोवऱ्या, झाडाच्या फांद्या पेटवून अग्निदेवतेची पूजा केली जाते. शहरात विविध ठिकाणी होळी आणि धूलिवंदनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे, पाणीबचतीचे आवाहन करण्यात आले आहे.होळीच्या दिवशी अग्नीला फेऱ्या मारून नारळ फोडून पूजा केली जाते. अग्नीला शांत करण्यासाठी ही पूजा केली जाते, असे मानले जाते. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती ‘बोंबा’ मारत लोक प्रदक्षिणा घालतात. या दिवशी घरोघरी पुरणपोळीचा बेत आखला जातो. दुसऱ्या दिवशी धूलिवंदन असल्याने विविधरंगी पिचकाऱ्या, फुगे, बंदूक यांच्या खरेदीसाठी बाजारात लगबग सुरूआहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा पाण्याची नासाडी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तीव्र पाणीटंचाई असताना होळी व रंगपंचमी शास्त्रापुरतीच साजरी करण्याचे आवाहन पंचांगकर्त्यांनी केले आहे. कालनिर्णय, दाते पंचांग, जन्मभूमी पंचांग, महाराष्ट्रीय पंचांग व लाटकर पंचांग यांनी एकत्र येऊन होळीसंदर्भात आवाहन केले आहे. साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराने यंदाची होळी दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना पुरणपोळीचे भोजन देऊन साजरी केली. या वेळी अवघ्या ५ गोवऱ्यांची होळी पेटवली गेली. याप्रसंगी महापौर प्रशांत जगताप म्हणाले, ‘पुण्यातील सर्व मंडळे, दानशूर व्यक्तींनी दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचा हा आदर्श समोर ठेवायला हवा. होळीची पोळी दुष्काळग्रस्तांसह खाल्ल्यास त्याची गोडी आणखी वाढेल.’रवींद्र माळवदकर म्हणाले, ‘बळीराजा सलग तीन वर्षांच्या दुष्काळामुळे अडचणीत आला आहे. त्यांची मुले पुण्यात शिकायला आहेत. त्यांना होळीच्या निमित्ताने पुरणपोळीच्या भोजनाचा आस्वाद देण्यातील आनंद काही वेगळाच आहे.’ यंदा होळीच्या निमित्ताने बायोस्फिअर्स या संस्थेच्या वतीने ‘हटवा तण, वाचवा वन’ या उद्दिष्टाखाली तण-होळी साजरी करण्याचा संकल्प केला आहे. परदेशी तणांमुळे पर्यावरणाचे, आर्थिक व्यवस्थेचे आणि आरोग्यविषयक धोके लक्षात घेऊन निसर्गसंवर्धनासाठी ही अनोखी होळी साजरी केली जाणार आहे.