शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरमध्ये जनआक्रोश मोर्चा

By admin | Updated: May 3, 2017 02:02 IST

राज्यातील ५५ लाख ३० हजार कोटी रुपयांचे कर्ज विनाअट माफ करण्यात यावे. अन्यथा या विषयावर इतर मागण्यांसाठी येत्या

इंदापूर : राज्यातील ५५ लाख ३० हजार कोटी रुपयांचे कर्ज विनाअट माफ करण्यात यावे. अन्यथा या विषयावर इतर मागण्यांसाठी येत्या पंधरा दिवसांनंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज (दि. २) येथे बोलताना दिला.या मोर्चाच्या निमित्ताने भाजपा सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली होती. गळ्यात डाळिंब, तूर, कांद्याचे हार घालून मोर्चात शेतकरी सहभागी झाले होते.शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी संभाजी चौकात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या कर्जाची संपूर्ण कर्ज माफी मिळावी, विद्युत पंपाचे वीज बील माफ व्हावे, तालुक्यातील पाण्याची टंचाई, खडकवासला व भाटघर धरणातील पाणी मिळावे, डाळिंब, कांदा, तूर व शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे, उजनी धरणाच्या पाण्याचे नियोजन करण्यात यावे, मागेल त्याला काम व पाणी मिळाले पाहिजे, भीमा व नीरा नदीवरील बंधारे पाण्याने भरण्यात यावेत या मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्या होत्या.हर्षवर्धन पाटील म्हणाले, की राज्यात १ कोटी ६५ लाख शेतकरी आहेत. त्यापैकी १ कोटी १० लाख शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे. शेतमालाला हमी भाव नाही. शेतकऱ्यांना पतपुरवठा नाही. शेतीला पाणी नाही. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. वीज बिल माफ झाले पाहिजे. शेतीचे उत्पन्न घटले आहे. नाकर्त्या नेतृत्वामुळे ५५ लाख शेतकऱ्यांच्या आयुष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बारामती व दौंड तालुक्यांना पाणी मिळाले.इंदापूर तालुक्याचे हक्काचे पाणी गेले कुठे, असा सवाल त्यांनी केला. अ‍ॅड. कृष्णाजी यादव यांनी प्रास्ताविक केले. सभापती करणसिंह घोलप, नगराध्यक्षा अंकिता शहा, माजी सभापती विलासराव वाघमोडे, मुरलीधर निंबाळकर प्रतीक्षा जामदार आदिंनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. (वार्ताहर)