शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल बंदीलाच 'जॅमर'

By admin | Updated: May 9, 2014 09:03 IST

येरवडा कारागृहामध्ये मोबाईल जॅमर बसविण्याची गृहराज्यमंत्र्यांनी विधानसभेत घोषणा करून वर्ष उलटले, तरी अद्याप ती यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही.

दिपक जाधव, पुणे

येरवडा कारागृहामध्ये मोबाईल जॅमर बसविण्याची गृहराज्यमंत्र्यांनी विधानसभेत घोषणा करून वर्ष उलटले, तरी अद्याप ती यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही. त्याचा चांगलाच फायदा उठवीत कारागृहाची अभेद्य सुरक्षा यंत्रणा भेदून कैद्यांकडून मोबाईल आतमध्ये नेण्याचे प्रकार घडत आहेत.येरवडा कारागृहातील अतीसुरक्षा विभागामध्ये (अंडासेल) एका सराईत गुन्हेगाराच्या तपासणीमध्ये त्याच्याकडे मोबाइल आढळून आल्याचे 'लोकमत'ने उजेडात आणले. कतिल सिद्दीकीचा येरवडा कारागृहामध्ये खून झाल्यानंतर कारागृहामध्ये मोबाइल जॅमर बसविण्याचा विषय चर्चेत आला. विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना १८ मार्च २0१३ रोजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी कारागृहांत मोबाइल जॅमर बसविणार असल्याची माहिती दिली होती.गुन्हेगारांच्या टोळयांचे म्होरके कारागृहामध्ये बसून टोळीची सुत्रे हलवित असल्याचे अनेकदा उजेडात आले आहे. साथीदारांशी संपर्क साधण्याकरिता ते अनेक मार्गांचा अवलंब करतात. कारागृहातील तुरूंगाधिकारी, तुरूंगरक्षक यांच्या मोबाइलवरूनही कैदी साथीदारांशी संपर्क साधत असल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कारागृहांमध्ये मोबाइल जॅमर बसविणे गरजेचे आहे. कर्मचारी मॅनेज झाल्याची शक्यतायेरवडा कारागृहातील सुरक्षा यंत्रणा भेदून कपडयांमध्ये मोबाइल लपवून अंडासेलपर्यंत नेणे ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. कारागृहाच्या कर्मचार्‍यांना मॅनेज करूनच मोबाइल आतमध्ये नेण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींचा शोध कारागृह प्रशासन घेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. येरवडा पोलिसांकडून चौकशी सुरू येरवडा कारागृहातील कैदी मुन्ना शेख याच्याकडे मोबाइल आढळून आल्याप्रकरणी त्याच्याविरूद्ध भादंवि कलम १८८ अन्वये येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून मोबाइल हस्तगत केल्यानंतर त्याने तुरूंगरक्षकांना धमकविल्याचेही स्पष्ट झाले आहे. सहायक निरीक्षक जाधव या प्रकरणाचा तपास करीत आहेत. याप्रकरणी लवकरच त्याला अटक करून न्यायालयामध्ये हजर केले जाण्याची शक्यता आहे. येरवडा कारागृहातील अनेक गैरप्रकार उजेडात येत आहेत, याचपार्श्‍वभुमीवर अतीसुरक्षा विभागात (अंडासेल) कैद्याकडे मोबाइल सापडण्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. यासंपूर्ण प्रकरणाची नवृत्त न्यायाधीशांमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी राज्याचे प्रधान गृहसचिव अमिताभ राजन यांच्याकडे लिगल राइट सोसायटीचे अध्यक्ष अनुप अवस्थी यांनी केली आहे.