शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

मेघकडून जेम्स पराभूत

By admin | Updated: June 1, 2017 02:35 IST

भारताच्या मेघ भार्गव पटेलने मुलांच्या एकेरीत जागतिक क्र. १२७ असलेल्या जपानच्या जेम्स ट्रॉटरचा पराभव करून १८ वर्षांखालील

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : भारताच्या मेघ भार्गव पटेलने मुलांच्या एकेरीत जागतिक क्र. १२७ असलेल्या जपानच्या जेम्स ट्रॉटरचा पराभव करून १८ वर्षांखालील आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. दुसरीकडे सिद्धांत बांठिया व महक जैन यांसह दिग्विजय सिंग, सालसा आहेर, वैदेही चौधरी, मिहिका यादव या भारतीय खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील एमएसएलटीए स्कुल आॅफ टेनिसच्या कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात जागतिक क्र. ५१६ असलेल्या भारताच्या मेघ भार्गव पटेल याने जागतिक क्र. १२७ असलेल्या जपानच्या जेम्स ट्रॉटरचा २-६, ७-५, ६-१ असा तीन सेटमध्ये पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. अव्वल मानांकित व भारताच्या सिद्धांत बांठिया याने आपली विजयी मालिका कायम ठेवत थायलंडच्या अकनीत पमजीतचा ६-२, ७-५ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. तैपेईच्या हो रे याने जपानच्या व पाचव्या मानांकित सेइता वात्नाबीचा ६-३, ६-३ असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. भारताच्या दिग्विजय सिंग याने थायलंडच्या व आठव्या मानांकित पलाफूम कोवापिटुकटेडचा ६-४, ६-२ असा पराभव करून आगेकूच केली. चीन क्रिस्टियन्स दिदिअर याने जपानच्या व चौथ्या मानांकित रियुकी मत्सुदावर ७-५, ६-१ असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. मुलींच्या गटात अव्वल मानांकित व भारताच्या महक जैन हिने जपानच्या सकुरा होसोगीचे आव्हान ६-०, ६-२ असे मोडीत काढले. जपानच्या मना कवामुरा हिने भारताच्या व तिसऱ्या मानांकित आकांक्षा भानला ६-१, ६-३ असे नमविले. जपानच्या फुना कोझाकी हीने आठव्या मानांकित व भारताच्या रिया वर्माचा ६-३, ६-४ असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली.