शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जैन पर्युषण महापर्व विशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पर्युषण महापर्वामध्ये महावीर जन्मकल्याणक वाचनाला महत्त्व असते. कोरोनामुळे यंदा हा कार्यक्रम मंगळवारी ऑनलाईन पद्धतीने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पर्युषण महापर्वामध्ये महावीर जन्मकल्याणक वाचनाला महत्त्व असते. कोरोनामुळे यंदा हा कार्यक्रम मंगळवारी ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय बहुतांश जैन मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतला आहे. त्यामुळे घरोघरी भगवान महावीरांच्या पाळण्याचे आयोजन करण्यात येणार नाही.

शहरात चातुर्मासार्थ, आचार्य दौलतसागरजी, आचार्य नंदीवर्धनसागरसुरीश्वरजी, गणिवर्य वैराग्यरतिविजयजी, आचार्य विमलबोधीजी, हर्षसागरसुरीजी, लाभेशविजयजी यांच्यासह अनेक साधु साध्वीजींच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत.

जैन धर्मीयांच्या पर्युषण महापर्वाच्या पाचव्या दिवशी भगवान महावीरांच्या जन्मकल्याणकाचे वाचन करण्यात येते. मंदिरमार्गमध्ये हा दिवस येत्या मंगळवारी (ता.७) येत आहे. भगवंतांनी एकूण २७ वेळा मानवजन्म धारण केले. त्यापैकी, एक जन्म हा पर्युषण महापर्वाच्या पाचव्या दिवशी येतो.त्यामुळे, पाचव्या दिवशी त्यांचा जन्मकल्याणक साजरा करण्यात येतो. जैन साधु- साध्वीजींच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यादिवशी, भगवंतांच्या जन्माप्रीत्यर्थ प्रातिनिधिक स्वरूपात छोटा सजवलेला पाळणा तयार करून, त्यात भगवान स्वरूपात श्रीफळ ठेवण्यात येते.

मंदिरांमध्ये मुख्य जन्मकल्याणकाचा कार्यक्रम झाल्यानंतर हा पाळणा काही भाविक काही तासांसाठी आळीपाळीने आपल्या घरी घेऊन जातात. त्यावेळी भगवंतांचे दर्शन घेण्यासाठी तसेच पूजा-अर्चा करण्यासाठी साधर्मिक बंधु भगिनींना निमंत्रित करण्यात येते. त्यामुळे गर्दी होण्याची दाट शक्यता असते. या सर्व कारणांमुळे हा दिवस धामधुमीचा असतो.

कोरोनामुळे, या सर्व धार्मिक कार्यक्रमांना यंदा फाटा देण्याचा निर्णय बहुतांश मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतला आहे. त्याऐवजी महावीर जन्मकल्याणकाचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.